Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एमएसबीटीई डिप्लोमा परीक्षांचा निकाल जाहीर; असा पाहता येणार Final Result

17

MSBTE Winter Diploma Result 2023 : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने आज, २४ जानेवारी २०२४ रोजी एमएसबीटीई हिवाळी पदविका (MSBTE Diploma Winter Exams 2023) परीक्षांचे निकाल जाहीर केला आहे. हिवाळी पदविका परीक्षेत बसलेले उमेदवार एमएसबीटीईच्या अधिकृत वेबसाइट msbte.org.in वरून त्यांचे निकाल पाहू शकतात.

MSBTE अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा १ ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षा दोन शिफ्टमध्ये पार पडल्या. सकाळची शिफ्ट सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० आणि दुसरी शिफ्ट दुपारी २.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत होती. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा होता. तर, सेमिस्टर-१ च्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. इतर विद्यार्थ्यांसाठी त्या परीक्षा १६ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.

MSBTE 2023 च्या हिवाळी सत्रातील डिप्लोमा परीक्षेचा निकाल असा तपासा :

उमेदवार त्यांचा हिवाळी डिप्लोमा २०२३ चा निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :

पायरी १ : msbte.org.in या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (MSBTE) अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

पायरी २ : मुख्यपृष्ठावर, “हिवाळी २०२३ डिप्लोमा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा” असे लिहिलेल्या दुव्यावर क्लिक करा.

पायरी ३ : तुम्हाला एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल, तुमचा नावनोंदणी क्रमांक किंवा आसन क्रमांक प्रविष्ट करा.

पायरी ४ : तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

पायरी ५ : निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट घ्या

MSBTE Winter Diploma Result 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिक अपडेटसाठी, उमेदवारांना msbte.org.in वर अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
MSBTE डिप्लोमा परीक्षेबद्दल :

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन (MSBTE) राज्यातील वेगवेगळ्या डिप्लोमा प्रोग्रामचा भाग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हिवाळी डिप्लोमा परीक्षा घेते. या परीक्षा साधारणपणे डिसेंबरमध्ये होतात आणि पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये निकाल जाहीर केले जातात. हिवाळी परीक्षांमध्ये लेखी आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही परीक्षांचा समावेश असतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.