Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Google चा नवा शक्तिशाली फोन येतोय बाजारात; लाँच पूर्वीच दिसली Pixel 9 Pro ची झलक

8

सर्च इंजिन जायंट ब्रँड गुगल यावर्षी देखील आपले नवीन फ्लॅगशिप मोबाइल्स बाजारात सादर करणार आहे. कंपनी पिक्सल सीरीज अंतगर्त Google Pixel 9 आणि Google Pixel 9 Pro स्मार्टफोन लाँच करू शकते. अद्याप या स्मार्टफोनच्या लाँचची कोणतीही तारीख किंवा इतर माहिती अधिकृतपणे समोर आली नाही परंतु माय स्मार्ट प्राइस आणि ऑनलीक्सनं प्रो मॉडेलच्या 5K रेंडरसह ३६० डिग्री व्हिडीओ शेयर केला आहे.

Google Pixel 9 Pro रेंडर्स

लीक रेंडर्सनुसार गुगल पिक्सल ९ प्रो डिव्हाइसमध्ये पंच होल कट आउट डिजाइन मिळू शकते. तसेच डिवाइसचा डिस्प्ले पातळ बेजल्ससह दिसला आहे. डिव्हाइसमध्ये फ्लॅट फ्रेम देण्यात आली आहे, फोनच्या उजवीकडे पावर आणि वॉल्यूम बटन देण्यात आले आहेत.

डिवाइसच्या खालच्या बाजूला यूएसबी टाइप सी पोर्ट, स्पिकर ग्रिल, सिम ट्रे सारखे ऑप्शन्स दिसत आहेत. लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की फोनच्या टॉपला mmWave अँटीना आणि मायक्रोफोन दिला जाऊ शकतो. फोनचे डायमेंशन १६२.७ x ७६.६ x ८.५ मिमी असू शकतात. रेंडर्सनुसार, Google Pixel 9 Pro स्मार्टफोन रियर कॅमेऱ्यासाठी नवीन डिजाइन दिला जाऊ शकतो.

Google Pixel 9 Pro 360 डिग्री व्हिडीओ

लीकनुसार, Google Pixel 9 Pro फोनच्या डिस्प्लेची साइज ६.५ इंच असू शकते, यात फ्लॅट पॅनल मिळण्याची शक्यता आहे.फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो ज्यात पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. सध्या जे रेंडर समोर आले आहेत त्यानुसार, Google Pixel 9 Pro व्हेरिबल अपर्चरला सपोर्ट करू शकतो.

Google Pixel 8 Pro चे फीचर्स

Google Pixel 8 Pro मध्ये ६.७ इंचाचा QHD डिस्प्ले देण्यात आला आहे, ही स्क्रीन १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड १४ वर चालतो. कंपनीनं ह्यात टेन्सर जी३ प्रोसेसर सोबत टायटन एम२ सिक्योरिटी चिप मिळते. पिक्सल ८ प्रोमध्ये १२जीबी रॅम मिळतो, जोडीला २५६जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे.

यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ५० एमपीचा मुख्य कॅमेरा, दुसरा ४८ एमपीचा सेन्सर आणि तिसरा ४८ एमपीचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये १०.५ एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी ५०५० एमएएचची बॅटरी ३० वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.