Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जर तुम्ही ५०१ रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचे Vi Max पोस्टपेड प्लॅन वापरत असाल तर आता तुम्हाला Swiggy One ची फ्री मेंबरशिप मिळेल. या मेंबरशिपची किंमत २,५०० रुपये आहे, परंतु Vi Max प्लॅनसह ही तुम्हाला मोफत मिळत आहे.
Vi ची ऑफर कंपनीच्या ‘Choice’ कँपेनचा भाग आहे. या कँपेन अंतर्गत Vi चे युजर्स इंटरटेंमेंट, फूड, ट्रॅव्हल आणि मोबाइल सुरक्षा सारख्या सेगमेंटमधून आवडीची सुविधा निवडू शकतात.
कोणत्या प्लॅन्सवर मिळेल ऑफर?
आता Vi आपल्या Vi Max पर्सनल आणि फॅमिली पोस्टपेड युजर्सना एकही रुपया अतिरिक्त खर्च न करता २५०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीची ‘Swiggy One मेंबरशिप’ देत आहे. Vi Max पोस्टपेड युजर्स ५०१ रुपये, ७०१ रुपये, REDX प्लॅन ११०१ रुपये, आणि Vi Max फॅमिली प्लॅन १००१ रुपये आणि ११५१ रुपयांचा प्लॅन वर स्विगी वन मेंबरशिप मिळवू शकतात. हा इतर अनेक बेनिफिट्स पैकी एक आहे.
Vi Max पोस्टपेडच्या पर्सनल आणि फॅमिली प्लॅनसोबत आवडीचे बेनिफिट्स हवे असतील तर पुढे या सेगमेंटची माहिती देण्यात आली आहे.
OTT: Amazon Prime, Disney+ Hotstar, SonyLIV आणि SunNXT चे सब्सक्रिप्शन
ट्रॅव्हल: Easemytrip वरून स्वस्त विमान तिकीट बुक करता येईल.
सिक्योरिटी: Norton 360 Mobile Security द्वारे तुमचा फोन सुरक्षित ठेवा
फूड: EazyDiner आणि आता Swiggy One Membership द्वारे जेवणावर सूट मिळवा.
वी मॅक्स पोस्टपेड प्लॅन्समध्ये ग्राहक स्वतःची लिमिट निश्चित करू शकतात तसेच प्रायॉरीटी कस्टमर सर्व्हिसचा देखील लाभ घेऊ शकतात.