Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रेडमीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी Samsung तयार! दोन स्वस्त 5G Phone येत आहेत भारतात

14

सॅमसंग संबंधित बातमी आली आहे की कंपनी दोन नवीन ५जी फोन बनवत आहे जे Samsung Galaxy M15 5G आणि Samsung Galaxy F15 5G नावानं लाँच होतील. ब्रँडनं मात्र या दोन्ही डिवाइसची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु हे दोन्ही सॅमसंग स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS वर लिस्ट झाले आहेत. चला या सर्टिफिकेशनची माहिती जाणून घेऊया.

बीआयएस लिस्टिंग

नवीन सॅमसंग स्मार्टफोन बीआयएसवर लिस्ट झाले आहेत. एक मॉडेल नंबर SM-M156B आहे जो Samsung Galaxy M15 5G नावाने भारतात लाँच होऊ शकतो. तर दुसरा फोन SM-E156B मॉडेल नंबरसह समोर आला आहे जो बाजारात Samsung Galaxy F15 5G नावाने एंट्री करू शकतो. बीआयएसवर या दोन्ही मोबाइल्सचे स्पेसिफिकेशन्स किंवा फीचर्स समजले नाहीत तर परंतु सर्टिफिकेशनमुळे गॅलेक्सी एम१५ ५जी आणि गॅलेक्सी एफ१५ ५जी लवकरच भारतात येतील हे निश्चित झालं आहे.

Samsung Galaxy M14 5G

सॅमसंग गॅलेक्सी एम१४ ५जी फोन ६.६ इंचाच्या लार्ज डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे जो फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. ही स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास ५ देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम१४ ५जी फोन अँड्रॉइड ओएसवर लाँच झाला आहे जो वनयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये सॅमसंगचा ही एक्सनॉस १३३० आक्टा प्रोसेसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M14 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग फोन १३ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy M14 5G फोनमध्ये ६,०००एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जी २५वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. सॅमसंगचा दावा आहे की ही बॅटरी सिंगल चार्जमध्ये ५८ तास टॉकटाइम किंवा २७ तास इंटरनेट सर्फिंग किंवा २५ तास व्हिडीओ प्लेबॅक टाइम देऊ शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.