Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काय आहे पत्र?
प्रकाश आंबेडकर,
अध्यक्ष,
वंचित बहुजन आघाडी
नमस्कार,
देश अत्यंत कठीण कालखंडातून जात आहे. आपण स्वतः महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या हुकूमशाही विरोधात खंबीरपणे आवाज उठवीत आहात. देश व संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हुकूमशाही विरुद्ध लढा देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक असून दिनांक २५ जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत वंचित’ आघाडीने सहभागी व्हावे, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. कृपया वंचित’ तर्फे महत्त्वाचे नेते आपण आजच्या बैठकीसाठी पाठवावे ही विनंती.
दरम्यान, महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी जोवर निमंत्रण देत नाही, तोपर्यंत कुठल्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतल्याचं वृत्त आहे.
वंचित बहुजन आघाडीचं उत्तर
वंचित बहुजन आघाडीला अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाच्या नेत्यांची स्वाक्षरी असलेले कुठलेही पत्र अथवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीला “बिन बुलाए मेहमान” बनून आम्ही जाणार नाही. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत जो दावा केला आहे तो खोटा आहे. आम्हाला जोपर्यंत तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या असलेले अधिकृत निमंत्रण प्राप्त होत नाही तो पर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. आमची शिवसेनेसोबत युती आहे पण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी नये.
वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडी आणि INDIA मध्ये करावा अशी भूमिका आम्ही सातत्याने मांडत आलो आहोत. त्यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्र लिहिले आहे. मात्र अद्याप काँग्रेसकडून त्यावर कुठलेच उत्तर किंवा प्रतिसाद मिळालेला नाही. काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सोबत थेट बोलणी करणे का टाळत आहे याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. महाविकास आघाडी आणि INDIA च्या संदर्भात बोलणी करण्याचे Power of attorney सर्वाधिकार काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिले आहेत का? हे ही त्यांनी जाहीर करावे.
जर नरेंद्र मोदी आणि भाजप यांना सत्तेतून खाली खेचायचे असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे ही आमची भूमिका आहे. मात्र प्रत्येक वेळी काँग्रेस नेते नवनवीन कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत. एकत्र येण्यात काँग्रेसला काय अडचण आहे हे त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे.
आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडी आणि INDIA मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करीत राहणार आहोत.
सिद्धार्थ मोकळे
मुख्य प्रवक्ता तथा प्रदेश उपाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News