Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
संपूर्ण देशभरात एकूण २७५ पोलीस शौर्य पदक आणि ७५३ गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले असून त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास १८ पोलीस शौर्य पदक आणि १ गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहेत. ही निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. तसेच सन २०२३ या वर्षामध्ये ६२ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले होते. सन २०२४ मध्ये एकूण १९ पोलीस अधिकारी/अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक आणि गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहे.
पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी आणि अंमलदार
१) सोमय विनायक मुंढे, भा.पो.से. पोलीस अधीक्षक लातुर
२) संकेत सतीश गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग करवीर जि. कोल्हापुर,
३) पोहवा/३०७८ मोहन लच्छु उसेंडी,
४) पोहवा/८७३ देवेंद्र पुरोषत्तम आत्राम
५) पोहवा/२७३४ जीवन बुधाजी नरोटे
६) पोहवा/२६१२ माधव कोरके मडावी,
७) पोहवा/२४७४ संजय वत्ते वाचामी
८) पोहवा/३०२९ मुंशी मासा मडावी
९) पोहवा/३०४७ गुरुदेव महारुराम धुर्वे
१०) पोनाअं/३७२९ कमलेश निखेल नैताम
११) पोनाअं/३७४३ शंकर पोचम बाचलवार
१२) पोनाअं/३०२६ विनोद मोतीराम मडावी
१३) पोनाअं/४१३६ दुर्गेश देविदास मेश्राम
१४) पोअं/३७१८ विजय बाबुराव वडेट्टीवार
१५) पोअं/५४८८ कैलाश श्रवण गेडाम
१६) पोअं/४४९७ हिराजी पिताबंर नेवारे
१७) पोअं/५६९७ ज्योतीराम बापु वेलादी
१८) पोअं/११५६ सुरज देवीदास चुधरी
यांना पदक मिळाले असून १ सहा.फौ/३२४८ देवाजी कोट्टु कोवासे यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे. वरील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपुर्ण कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य व गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले असून त्याबद्दल प्रभारी पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम. रमेश सा. या सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.