Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ठाणे जिल्ह्यात ६३ लाख मतदार, अंतिम मतदारयादीत ३४ लाख पुरुष, २९ लाख महिलांची नोंद

11

म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मतदार फेरनिरीक्षण कार्यक्रमानंतर २३ जानेवारी रोजी नवी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात ६३ लाख ९२ हजार ५२० मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ३४ लाख ४९ हजार ५७७ पुरुष तर २९ लाख ४१ हजार ७१५ महिला मतदार आहेत. त्यामुळे मतदारयादीवरून जिल्ह्यातील मतदारांचे स्त्रीपुरूष गुणोत्तर ८५३ असल्याचे समोर आले आहे. तृतीयपंथी मतदारांची संख्या ८४८ नोंदवण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विशेष संक्षिप्त फेरनिरीक्षण कार्यक्रमामध्ये ४८ हजार ८३१ मतदारांची वाढ झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील मतदारयाद्यांच्या संक्षिप्त फेरनिरीक्षण कार्यक्रमानंतर २३ जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. याविषयीची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. यापूर्वीच्या प्रारूप मतदारयादीमध्ये असलेल्या मतदारांमध्ये वाढ झाली आहे. १६ हजार ७८५ पुरुष मतदार वाढले असून ३१ हजार ७१५ महिला मतदार वाढले आहेत. तर, १३१ मतदारांची वाढ नोंदवण्यात आली असून एकूण ४८ हजार ६३१ मतदार वाढल्याचे समोर आले आहे. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या ६९ हजार ७२० झाली आहे. तर, २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या १० लाख २३ हजार ४२ आहे. तर, ७० हजार ७४५ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामध्ये ४७ हजार ७०९ मृत मतदार, चार हजार ३७९ दुबार मतदार तर १८ हजार ६५७ स्थलांतरित मतदारांची नावे वगळल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मतदारयादीमध्ये ३२ हजार ७३५ दिव्यांग मतदार आहेत. तर, ८३६ एनआरआय मतदार आहेत. १८ मतदारसंघांमध्ये ६ हजार ५२४ मतदान केंद्रे असून त्यामध्ये पाच हजार ४३२ शहरी तर एक हजार ९२ ग्रामीण मतदान केंद्रे आहेत.

अनाथ मुलांचं पालकत्व स्वीकारलं, सज्ञान होताच मुलांचे संसार फुलवले, अमरावतीच्या शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री
ओवळा-माजिवडामध्ये सर्वाधिक मतदार

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ क्रमांक १४६ ओवळा माजीवडा या मतदारसंघामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक चार लाख ८१ हजार ३१५ मतदार आहेत. त्या खालोखाल १५० ऐरोली येथे चार लाख ३९ हजार ३२१ मतदारांची नोंदणी झाली आहे. १४१ उल्हासनगरमध्ये सर्वांत कमी दोन लाख ४८ हजार ९०४ तर १४३ डोंबिवलीमध्ये दोन लाख ६६ हजार ५१० मतदारांची नोंदणी आहे.

नितीशकुमार यांच्याबाबत सस्पेन्स वाढला, भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरु, बिहारमध्ये मध्यावधी लागणार?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.