Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सोलापूर ग्रामीण एलसीबीची कामगिरी..
सोलापूर (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी ओरीसा राज्यातून विक्रीसाठी गांजा घेऊन येणाऱ्या टोळीचा पाठलाग करून त्यांच्याकडून ३६,०७,६००/- रूपये किंमतीच्या मुद्देमालासह दोघांना अटक करून एकूण ५ आरोपीविरूध्द टेंभूर्णी पोलीस ठाणे गु.र.नं. ८०/२०२४, गुंगीकारक औषण द्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (क), २९ चे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील २ आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांची (दि.३१जानेवारी) पर्यंत पो.क. रिमांड दिली आहे.
अवैध “गांजा” हा मादक व नशाकारक अंमली पदार्थाची अवैधपणे विक्री करण्यासाठी ओरीसा येथून घेवून तो अकलूज येथे घेवून जात असताना मिळून आल्याने एकूण ५ आरोपीविरूध्द टेंभूर्णी पोलीस ठाणे गु.र.नं. ८०/२०२४, गुंगीकारक औषण द्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (क), २९ चे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील २ आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांची दि.३१जानेवारी रोजी पर्यंत पो.क. रिमांड आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.२४जानेवारी) रोजी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक, सुरेश निंबाळकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मौजे मोडनिंब, ता.माढा गावच्या हद्दीतून जाधववाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गोलावर चौक येथे काही इसम दुपारी १४.०० वा. च्या नंतर त्यांचेकडील दोन चारचाकी वाहन १) मारूती सुझुकी ब्रेझा, पांढरे रंगाची कार क्रमांक MH-45/N-6752, २) रेनॉल्ट कंपनीची ट्रीबर, सिल्वर रंगाची कार क्रमांक MH-45/AQ-7821 मधून हे “गांजा” हे मादक अंमली पदार्थ ओरीसा राज्यातून घेवून येऊन तो अकलूज येथे घेवून जाणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. सदर बातमी ही खात्रीशीर असल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्व स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे व पोलिस अंमलदार यांना सतर्क केले.
गांजा या अंमली पदार्थावर छापा घालण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पोनि सुरेश निंबाळकर यांनी पथकास मोडनिंब गावातून जाधववाडी गावाकडे जाणारे रोडवरील गोलावर चौक येथे सापळा लावला. बातमीत नमूद वाहने ही मोडनिंब गावाकडून गोलावर चौकात येत असताना सापळा पथकाने त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर कारमधील चालकाने कार वेगाने अरण गावाकडे घेवून पळून जावू लागले. त्यावेळी पोनि सुरेश निंबाळकर, सपोनि धनंजय पोरे व पथकाने सदर कारचा शासकीय वाहनाने पाठलाग केला. सुर्वे यांच्या वस्तीजवळ जाणाऱ्या दोन्ही कार ह्या शासकीय वाहने आडवी लावून आडविण्यात आल्या. त्यावेळी कारमधील दोन इसमांना जागीच पकडण्यात आले असून तीन इसम हे पळून गेले. त्यातील मारूती सुझुकी ब्रेझा कार क्र. MH-45/N-6752 मध्ये एकूण १५ पाकीटे व ट्रीबर कार क्र. MH- 45/AQ-7821 मध्ये ३७ पाकीटे प्रत्येक पॉकेटमध्ये असणारे गांजाचे वजन २ किलोच्या आसपास असून त्याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आलेला आहे.
सदर दोन्ही कारमध्ये मिळून आलेल्या गांजा मध्ये १) ब्रीझा कार क्रमांक MH-45/N-6752 व MH-45/AQ-7821 मध्ये एकूण ५२ पॉकेटमध्ये १०५ किलो ३८० ग्रॅम वजनाचा एकूण किंमती २१,०७,६००/- २) दोन्ही वाहनांची किंमत १५,००,०००/- रूपये असा एकूण ३६,०७,६००/- रूपये किंमतीचे मुद्देमालासह अवैध “गांजा” हा मादक व नशाकारक अंमली पदार्थाची अवैधपणे विक्री करण्यासाठी ओरीसा येथून घेवून तो अकलूज येथे घेवून जात असताना मिळून आल्याने एकूण ५ आरोपीविरूध्द टेंभूर्णी पोलीस ठाणे गु.र.नं. ८०/२०२४, गुंगीकारक औषण द्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (क), २९ चे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील २ आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांची दि.३१जानेवारी रोजी पर्यंत पो.क. रिमांड आहे.
अशा प्रकारे सदरची कामगिरी शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अपर पोलिस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा.सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सपोनि धनंजय पोरे यांच्या सह सपोफौ/ श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर, म. इसाक मुजावर, पोहेकॉ/परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, पोकों विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, दिलीप थोरात, सतिश कापरे पो. ठाणे यांनी पार पाडली आहे.