Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
Pune कोंढवा:-पुणे शहरात सध्या दिवसा होणा-या घरफोड्यांच्या अनुषगांने कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार पो.हवा. ६९५१ विशाल मेमाणे, पो. हवा ७९ निलेश देसाई, पो.हवा ११६१ सतिश चव्हाण, पो.हवा १४२२ लवेश शिंदे, पो. शि.४७९ शाहीद शेख, पो.शि.९८३८ संतोष बनसुडे, पो. शि.८५९१ लक्ष्मण होळकर असे कोंढवा पोलीस स्टेशन अभिलेखावरील दिवसा दाखल झालेल्या घरफोडी गुन्ह्यांचा तपास करत असताना सीसीटीव्ही व गुप्त बातमीदाराच्या मदतीने अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना उंड्री भागातील राजदीप कॉम्पलेक्स, उंड्री येथे दिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्हयाचा तपासात करित असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोअंग शाहीद शेख व पोअंम संतोष बनसुडे यांना दोन इसम गुन्ह्याच्या घटनास्थळावर संशयीतरीत्या जात असताना दिसले, त्यांनी सदर इसमांचा जवळपास १५० सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून माग घेवून सय्यदनगर वानवडी भागातील गल्ली नं २८ येथील भाड्याच्या घरात सदर संशयीत इसम हे रहात असल्याचे व त्यांची नावे अहमद मुन्ना मलिक व यासीन अलीमुद्दीन मलिक अशी असल्याचे निष्पन्न झाले. परंतु सदर इसम हे मेरठ, उत्तरप्रदेश येथील मुळ रहिवासी ते रूम सोडुन गेल्याची माहिती स्थानिक नागरीकांकडुन प्राप्त झाली. तेव्हा सदर इसमांनीच चोरी केल्याचा संशय बळावल्याने ते पुणे रेल्वे स्टेशन येथुन पळुन जातील म्हणुन आम्ही पुणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी जावुन सापळा रचला सदर इसम हे दिनांक २०/०१/२०२४ रोजी पुणे रेल्वे स्टेशन या ठिकाणावरून रेल्वेत बसून पळुन चालले असताना त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी १. अहमद मुन्ना मलिक, वय ४९ वर्षे, रा. घर नं ११७१/५, दुसरका २० फुटा, जाकीर हुसेन कॉलनी मेरेठ राज्य उत्तरप्रदेश २. यासीन अलीमुद्दीन मलिक, वय ४७ वर्षे, रा. घर नं ११७१/५, गल्ली नं १५, सी ब्लॉक, जाकीर हुसेन कॉलनी, मेरेठ हापुर रोड, जिल्हा मेरेठ राज्य उत्तर प्रदेश असल्याचे सांगीतले. सदर आरोपी यांच्याकडे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील व पुणे शहरातील घरफोडी गुन्ह्यांच्या अनुषगांने संखोल व कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांनी उंड्री भागातील राजदीप कॉम्पलेक्स येथे तसेच काही दिवसापूर्वी लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील मोलेदिना रोड, गिताजली सोसायटी येथे दिवसा घरफोडी केल्याची कबुली देवून वरील दोन्ही गुन्ह्यातील ०२ लाख रूपये रोख रक्कम व ६ लाख रु किंमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व चांदीच्या
वस्तु असा एकुण ०८ लाख रूपयांचा मुद्देमाल हडपसर येथील एका भंगार दुकानात अडगळीत लपवून ठेवलेला
काटुन दिले. आरोपीकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहेत.
१) कोंढवा पोलीस ठाणे कडील गुरन. ७१/२०२४, भा.दं.वि. कलम. ४५४,३८० २) लष्कर पोलीस ठाणे कडील गुरन. ०१५/२०२४, भा.दं. वि. कलम. ४५४,३८०
वरिल नमुद कारवाई मा. रितेशकुमार साो, पोलीस आयुक्त, मा. रंजनकुमार शर्मा, सो अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त परि.०५, मा.शाहुराव साळवे सो सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो., कोंढवा पोलीस स्टेशन, श्री संदीप भोसले, मा. पोलीस निरीक्षक सो., गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस हवालदार/६९५१ विशाल मेमाणे, पोलीस हवालदार/७९ निलेश देसाई, पोलीस हवालदार/११६१ सतिश चव्हाण पोलीस हवालदार लवेश शिंदे पोलीस अंमलदार शाहिद शेख पोलीस अंमलदार संतोष बनसुडे पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केले आहे.