Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वाद मिटवायला गेले अन् अनर्थ घडला, ठाकरे गटाच्या युवा सेना शहरप्रमुखाची पोटात वार करुन हत्या

6

चंद्रपूर : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील शरद मोहोळची हत्या झाली. आता चंद्रपुरात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काल गुरुवारी रात्री उद्धव ठाकरे गटाचे युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर (वय २४ ) यांची धार धार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर जिल्ह्यात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आणि या प्रकरणी काही संशयतांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, हत्येचं नेमक कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा वझरकर हे रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास अग्रवाल कोचिंग क्लासेसच्या बाजूला उभे होते. याचवेळी अद्यात आरोपींनी शिवा यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्यात वझरकर गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वझरकर यांचा मृत्यू झाला होता. वझरकर हे शिवसेना ठाकरे गटाचे सक्रिय कार्यकर्ते होते. विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग होता. घटनेनंतर वझरकर समर्थकांनी संशयित आरोपीच्या वाहनांची तोडफोड केली. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी ही स्थिती संयमानी हाताळली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Indian Economy: ना ३, ना ५, भारतीय अर्थव्यवस्था आता तब्बल इतक्या ट्रिलियन डॉलरची; पंतप्रधान मोदींची गर्जना
बाचाबाची अन हल्ला…

मयत व आरोपींमध्ये काही वाद झाला होता. त्याबाबत बोलण्याकरता वझरकर हे आरोपीला भेटायला गेले होते. मात्र, त्याठिकाणी बाचाबाची झाली आणि वाद वाढला. या वादात युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर यांच्या पोटात धारदार शस्त्राने हल्ला झाला. या हल्ल्यात शिवा वझरकर यांचा जागीच मृत्यू झाला.

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारीला का साजरा केला जातो..? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.