Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिंदेंनी दंड थोपटले, भाजपकडून तयारी, इकडे मविआचा उमेदवार फिक्स नाही, पालघरमध्ये काय होईल?

7

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा रंग चढू लागला आहे. २०१९ मध्ये शिवसेनेचा खासदार येथे निवडून आल्याने शिंदे गट ह्या मतदरसंघांवर दावा करत आहे. तर पूर्वापार हा मतदारसंघ आपलाच असल्याने भाजपने हा मतदारसंघ मिळविण्यासाठी व लढविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसऱ्या बाजूने महविकास आघाडीतून ठाकरे गटाकडे ही जागा जाण्याची शक्यता असताना एकदा पालघर लोकसभा जिंकणारी बहुजन विकास आघाडी रिंगणात उतरणार की नाही? हा प्रश्न उपस्थित होणार आहे. बविआ स्वतंत्रपणे रिंगणात राहिल्यास या मतदारसंघांत कोणाचे पारडे जड राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. अर्थात ‘वाढवण’सह विविध प्रकल्पांनुषंगाने जिल्ह्यात असलेला असंतोष, तसेच जिल्ह्यातील प्रामुख्याने विविध आदिवासी संघटना आदींच्या प्रभावाचा मुद्दाही निवडणुकीत महत्वाचा घटक ठरणार आहे.

जिल्ह्यातील महत्वाचे प्रश्न, समस्या-

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुपोषण, बेरोजगारी, स्थलांतर, पाणीटंचाई, मत्स्य उत्पादनात झालेली घट, प्रदूषण या मोठ्या समस्या आहेत. जिल्ह्यातून मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर यांसारखे अनेक मोठ्या प्रकल्प पालघर जिल्ह्यातच होत आहेत. या प्रकल्पांना स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध दिसून आला आहे. मात्र तरीही मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग आणि बुलेट ट्रेन यांचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. आता स्थानिकांचा प्रचंड विरोध असतानाही वाढवण बंदर प्रकल्प रेटून नेण्याचे प्रयत्न होत असल्याने लोकांमध्ये लोकप्रतिनिधींविरोधात मोठा असंतोष आहे. या सर्व बाबींचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर काय प्रभाव पडतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

वेध लोकसभा निवडणुकीचा : कल्याण सर्वाधिक चर्चेत, २०२४ च्या निवडणुकीत काय होणार?
पालघर लोकसभा उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गट, भाजपमध्येच रस्सीखेच:-

पालघर लोकसभा मतदारसंघात राजेंद्र गावित हे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार असून पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा हे आमदार आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेची ताकद असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या देखील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के व खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील पालघर येथे मेळाव्यात विद्यमान खासदार राजेंद्र गावित हेच धनुष्यबाण चिन्हावर लोकसभा निवडणूक लढतील व जिंकतील असे पालघर लोकसभा मतदार संघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे.

पूर्वाश्रमीची असलेली पालघर लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी भाजपने तयारी देखील सुरू केली आहे. भाजपच्यावतीने आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांचे दौरे, मेळावे देखील पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे भाजपच्या अंतर्गत देखील खासदार राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे कळते. राज्याचे दिवंगत आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉ. हेमंत सावरा, त्याचबरोबर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार विलास तरे यांची नावं भाजपाकडून लोकसभेसाठी चर्चेत आहेत.

वेध लोकसभा निवडणुकीचा : बारामतीत यंदा भाजप उमेदवार देणार की दादांचा उमेदवार सुप्रियाताईंना नडणार?
महायुती मेळाव्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत देखील महायुतीचा पालघर लोकसभेचा उमेदवार कोण याबाबत स्पष्टपणे उत्तर देण्यास आले नाही. त्याचप्रमाणे महायुतीच्या मेळाव्यात देखील याबाबत कोणतीही वाच्यता करण्यात आली नाही. शिवसेना शिंदे गट व भाजप या दोनही पक्षांमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार-

पालघर लोकसभा निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाविकास आघाडीतील घटक पक्ष मिळून लढवणार असेच काहीसे चित्र पाहावयास मिळत आहे. पालघर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद पूर्वीइतकी राहिलेली नाही, मात्र काँग्रेस देखील या मतदारसंघावर दावा करू शकते. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पालघर जिल्ह्यातील ताकद लक्षात घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पालघर लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कामडी यांचे नाव चर्चेत आहे. तर काँग्रेसचे माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांनीही ठाकरे गटाशी संपर्क साधल्याची चर्चा होत आहे.

वेध लोकसभा निवडणुकीचा : तीन राज्यांच्या विजयाने मनोबल उंचावले तरी भाजपसाठी सोपी नसेल पुणे लोकसभा!
कोकणासह पालघर जिल्ह्यात सध्या नावारूपाला आलेली जिजाऊ संघटना या संघटनेचे मोठे प्राबल्य पालघर लोकसभा मतदारसंघात दिसू लागले आहे. त्यामुळे जिजाऊ संघटना नेमकी कोणाला साथ देते की एकाकी लढते याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे.

बहुजन विकास आघाडीची भूमिका अत्यंत महत्त्वाची, बविआच्या भमिकेकडे लक्ष –

बहुजन विकास आघाडी या पक्षाची पालघर लोकसभेच्या निवडणुकीततील भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघ हे बहुजन विकास आघाडीकडे आहेत. वसई विरार या परिसरात बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असून बोईसर विधानसभा मतदारसंघ देखील बहुजन विकास आघाडीकडेच आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव विजयी झाले होते. त्याचप्रमाणे २०१९ ची निवडणूक बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने लढवली. दरम्यान बहुजन विकास आघाडीकडून माजी खासदार बळीराम जाधव त्याचप्रमाणे बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

वेध लोकसभा निवडणुकीचा : शिरूर लोकसभेसाठी अनेक इच्छुक, अजित पवारांचं अमोल कोल्हेंना आव्हान, उमेदवार कोण?
बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडी सोबत म्हणजेच इंडिया आघाडीसोबत येऊन ही जागा बहुजन विकास आघाडी पालघर लोकसभेची जागा इंडिया आघाडी सोबत लढवणार की नाही? बहुजन विकास आघाडी स्वतंत्रपणे पालघर लोकसभा निवडणूक लढवणार? २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर नेमकी काय भूमिका हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

२००९ ते २०१९ पर्यंत पालघर लोकसभा निवडणूक-

२००९ ची लोकसभा निवूणुक काँग्रेस- राष्ट्रवादी, भाजप- शिवसेना महायुती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली. यावेळी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव विजयी झाले होते. बविआचे बळीराम जाधव यांना 2 लाख 23 हजार 234 म्हणजे जवळपास ३० टक्के मते मिळाली होती.

वेध लोकसभा निवडणुकीचा : यंदा शेकापचं टॉनिक नाही, तटकरेंचा कस लागणार, गीते पुन्हा मैदानात, रायगडमध्ये काय होईल?
२०१४ मध्ये झालेल्या पालघर लोकसभेच्या निवडणुकीत एकूण ६१.५३ टक्के मतदान झाले. यामध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे चिंतामण वनगा हे निवडून आले होते. वनगा यांना ५ लाख ३३ हजार २०१ मते मिळाली तर बळीराम जाधव यांना २ लाख ९३ हजार ६८१ मते मिळाली. भाजपचे चिंतामण वनगा हे २ लाख ३९ हजार ५२० मतांनी विजयी झाले होते. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने राजेंद्र गावित यांना काँग्रेस पक्षातून आयात केले व राजेंद्र गावित हे भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणुकीत विजयी झाले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. त्यानंतर भाजपमध्ये असलेले राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ ची निवडणूक भाजप- शिवसेना महायुती विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी लढली गेली. यावेळी महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला. मात्र तरी देखील या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले राजेंद्र गावित विजयी झाले. शिवसेना-भाजप महायुती उमेदवार राजेंद्र गावित यांना एकूण झालेल्या मतदानाच्या ४८.३० टक्के अर्थात ५ लाख १५ हजार मते मिळाली होती. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना ४६.९० टक्के अर्थात ४ लाख ९१ हजार ५९६ मते मिळाली होती. शिवसेना- भाजप महायुती उमेदवार राजेन्द्र गावित यांनी २३ हजार ४०४ मतांनी विजय मिळवला.

वेध लोकसभा निवडणुकीचा : ठाकरेंचा शिलेदार ठरला, शिंदे पुन्हा आप्पांनाच मैदानात उतरवणार, मावळ लोकसभेत काय होईल?
पालघर जिल्ह्यातील विधानसभानिहाय सद्यस्थिती

पालघर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असून यात पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड, नालासोपारा आणि वसई हे विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पालघर जिल्ह्यात एकाही विधानसभा क्षेत्रात विजय मिळवता आलेला नसून पालघर जिल्हा हा भाजपमुक्त असल्याचे सद्यस्थितीचे विधानसभा निहाय चित्र आहे. डहाणू विधानसभा मतदार संघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले, विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गटाचे) सुनील भुसारा, पालघर शिवसेना शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा हे आमदार आहेत. बोईसर, नालासोपारा, वसई या तीन विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाचे वर्चस्व असून तीन आमदार आहेत. राजेश पाटील हे बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तर नालासोपारा मतदारसंघात क्षितिज ठाकूर व वसई विधानसभा मतदारसंघात बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर असे एकूण तीन आमदार आहेत.

वेध लोकसभा निवडणुकीचा : शिर्डीत महायुतीची ताकद पण पवार-ठाकरेंना मोठी सहानुभूती, लोकसभेला काय होऊ शकतं? वाचा…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.