Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१२८जीबी मेमरी पुरत नाही? फक्त १० हजारांत २५६जीबी स्टोरेजसह येतोय ‘हा’ फोन, कंपनीनं केली घोषणा

7

टेक्नो सतत भारतात स्वस्त स्मार्टफोन सादर करत आहे, यात एका नवीन फोन Tecno Spark 20 ची भर पडणार आहे. कंपनीनं डिवाइसच्या लाँचची घोषणा सोशल मीडियावर टीजरच्या माध्यमातून केली आहे. हा मोबाइल जागतिक बाजारात आधीच उपलब्ध आहे आणि त्याच स्पेसिफिकेशनसह भारतात एंट्री होण्याची शक्यता आहे. लीकनुसार फोनमध्ये मोठी स्टोरेज कमी किंमतीत मिळू शकते.

Tecno Spark 20 भारतीय लाँच

टेक्नोनं आपल्या सोशल मीडिया इंडिया हँडलवरून Spark 20 मोबाइलच्या लाँचची माहिती दिली आहे. कंपनीनं पोस्टमध्ये डिवाइस समोर कमिंग सून लिहलं आहे. परंतु लाँच डेट सांगितली नाही. डिव्हाइसमध्ये मोठी स्टोरेज आणि शानदार सेल्फी कॅमेरा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोस्टमध्ये फोन मधील पावर, वॉल्यूम बटन, कॅमेरा माड्यूल आणि एलईडी फ्लॅश दिसत आहे.

Tecno Spark 20 ची लीक किंमत

टिपस्टर मुकुल शर्मानं फोन बाबत मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार, फोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाँच होऊ शकतो. यात रियर पॅनलमध्ये लेदर फिनिश असेल. तसेच हा २५६ जीबी स्टोरेजसह येईल. इतकेच नव्हे तर, टिपस्टरनं सांगितलं आहे की टेक्नो स्पार्क २० ची भारतात किंमत १०,००० रुपयांच्या आसपास असू शकते.

Tecno Spark 20 चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark 20 मध्ये ६.५६ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला एलसीडी पॅनल आहे. परफॉर्मन्ससाठी मोबाइलमध्ये MediaTek Helio G85 एंट्री लेव्हल प्रोसेसर आहे. फोनमध्ये ८जीबी रॅम व २५६जीबीची मोठी स्टोरेज मिळते. इतकेच नव्हे तर रॅम वाढवण्यासाठी ८जीबी एक्सटेंटेड रॅमचा सपोर्ट देखील आहे. Tecno Spark 20 अँड्रॉइड १३ आधारित HiOS UI वर चालतो.

कॅमेरा फीचर्स पाहता हा फोन ५०एमपीच्या अल्ट्रा क्लियर रियर कॅमेरा आणि ३२एमपीच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात येईल. पावर बॅकअपची जबाबदारी यातील ५,०००एमएएचच्या बॅटरीवर असेल जी १८वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात येईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.