Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एअर इंडिया एअर सर्विसेसमध्ये विविध पदांची थेट मुलाखत माध्यमातून भरती! आजच करा अर्ज

16

Air India Air Transport Services Limited Jobs 2023: विमान सेवेत काम करण्याची इच्छा असेल आणि नोकरीच्या शोधत आसाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी समोर आली आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) या कंपनीद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सिक्युरिटी एक्झिक्युटिव (Security Executive) पदाच्या एकूण १३० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन, अर्ज प्रक्रिया आणि सविस्तर माहिती पाहूया…

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून त्याचे सविस्तर तपशील मूळ अधिसूचनेत दिले आहेत. अधिसूचनेची लिंक खाली जोडली आहे.

वयोमर्यादा :

यासाठी अर्ज करणारे उमेदवाराचे वय 0जानेवारी 2024 रोजी जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. यामध्ये ओबीसी प्रवर्गाला कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची तर एससी/एसटी वर्गाला ५ वर्षांची सवलत आहे.

मिळणार एवढा पगार :

ही भरती प्रक्रिया १३० रिक्त जागांसाठी होणार असून यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार २० हजारांहून अधिक पगार दिला जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता :

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण चेन्नई आणि मुंबई असून उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

चेन्नई : एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम छावणी, चेन्नई ६०००४३.

मुंबई : एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सीएसएमआय विमानतळ, सीआयएसएफ गेट नंबर ५ जवळ, सहार, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९९

या पत्त्यावर मुलाखतीसाठी ०१, ०२ आणि ०३ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत उपस्थित राहायचे आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क म्हणून जनरल/ओबीसी साठी 500 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे तर SC/ST/ExSM साठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.

या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.