Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चायनीजची गाडी सुरु होणार म्हणून सेलिब्रेशन पार्टी, वाद झाला अन् नको ते घडलं, एकाचा मृत्यू

11

ठाणे (कल्याण) : कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. दोन मित्र चायनिज गाडी सुरू करणार होते. त्याअगोदरच एका मित्रानेच दुसऱ्या मित्राचा काटा काढला. चायनीज गाडी सुरू करण्याच्या सेलिब्रेशन पार्टीत रंगाचा बेरंग झाला. या पार्टीत दरम्यान क्षुल्लक वादातून लोखंडी पत्रा डोक्यात घालून मित्राला ठार केल्याचे समोर आले आहे. मानपाडा पोलिसांनी खून करणाऱ्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

दोन मित्र पार्टनरशिपमध्ये चायनीज गाडी सुरू करणार होते. या आनंदात दोघांनी पार्टी दिली. मात्र, या दारू पार्टीमध्ये शुल्लक वादातून दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राला कायमचा यमसदनी धाडला. ही धक्कादायक घटना कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या आडीवली परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वाजिद सय्यद असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी परेश शीलकर या तरुणाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

मलंगगड रोड परिसरात राहणारा परेश शिलकर आणि अब्दुल उर्फ वाजिद सय्यद हे पार्टनरशिपमध्ये चायनीजची गाडी सुरु करणार होते. दोघांची तयारी झाली होती. काही दिवसांतच या दोघांचे चायनीज सेंटर सुरू होणार होते. यामुळे वाजिद सय्यद आणि परेश शिलकर व त्याच्या मित्रांनी अडवली परिसरातील एका निर्मानाधीन इमारतीमध्ये ओली पार्टीचे आयोजन केले होते.

सेलिब्रेशन पार्टीत वाजिद सय्यद आणि परेश शिलकर यांचे मित्र देखील होते. पार्टी दरम्यान वाजिद व परेशमध्ये वाद झाला. या वादातून परेशने वाजिद सय्यदवर लोखंडी पत्र्याने हल्ला केला. घाव जिव्हारी लागल्याने वाजिद जागीच ठार झाला. धक्कादायक म्हणजे हल्ला केल्यानंतर परेशनेच पोलिस कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली. मानपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परेशला ताब्यात घेतले. या प्रकरणी मानपाडा पोलिस अधिक तपास करत आहे.

अब्दुल उर्फ वाजिद सय्यदचा मृतदेह मानपाडा पाेलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला. रात्री शवविच्छेदन झाले नाही. सकाळीही झाले नाही. दुपारपर्यंत नातेवाईक ताटकळत होते. नातेवाईकांनी जेव्हा रुग्णालयात विचारले की, शवविच्छेदन का केले जात नाही ? इतका उशिर का होत आहे ? त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि एमडी डॉक्टर नसल्याने शवविच्छेदन होऊ शकत नसल्याचे सांगितले. पोलिसांनाही हेच सांगण्यात आले. अखेर १२ तासानंतर मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयाकडे घेऊन जाण्याची वेळ मृताच्या नातेवाईकांवर आली. कुटुंबीयाचे म्हणणे आहे की, रुग्णालयात एमडी डॉक्टर आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट नव्हता. तसेच एमडी डॉक्टर उपलब्ध नाही. तर आम्हाला याची आधीच कल्पना का दिली नाही ? आम्हाला १२ तास ताटकळत का ठेवले ? मृतदेह पंख्याखाली उघडा का ठेवला ? अशी प्रश्नांची सरबत्ती करून मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला बेजबाबदार ठरवले.
JDU च्या दहा आमदारांना लालूंचा फोन, मांझींना मुख्यमंत्रिपदाची ऑफर, नितीश कुमारांना काटशह?
या संदर्भात डॉ. पराग पाडवी म्हणाले, आमच्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट नाही. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. अशा प्रकरणात फारेन्सीक एक्सपर्ट लागतो. त्यामुळे शवविच्छेदन झाले नाही. त्याचबरोबर आजपर्यंत डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णलायत शवविच्छेदन कक्ष सुरु झालेले नाही. लोकांचे अजूनही हाल होत आहेत.
Budget 2024: बजेट सादर होताच निर्मला सीतारामन नावावर होणार नवा विक्रम, मोरारजी देसाईंच्या पंगतीत बसणार
वास्तविक पाहता या प्रकरणात फॉरेन्सीक एक्सपर्टची गरज नाही. आरोपी सापडला आहे. हत्यारही सापडले आहे. केवळ टाळाटाळ करण्यासाठी रुग्णालयाकडून शवविच्छेदन केले जात नाही. हा रुग्णलयाचा बेजबाबदारपणा आहे हेच यातून उघड झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला.
मनोज जरांगे कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झाले, गुणरत्न सदावर्तेंचा सवाल, कायद्याचा संदर्भ देत सरकारला सुनावलं
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.