Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कोयता बाळगणारा सराईत, धोकादायक गुंड ‘एमपीडीए’ कायद्याखाली स्थानबद्ध.,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांची मोठी कारवाई…..
लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यातील एम.पी.डी.ए. कायद्यानुसार करण्यात आलेली पाचवी कारवाई. सार्वजनिक शांततेस धोका असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला. वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलिस अधीक्षक.सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गंत लातूर जिल्ह्यातील
पवन सहदेव जाधव, वय 21 वर्ष, राहणार संजय नगर,औसा सध्या राहणार म्हाडा कॉलनी, लातूर
याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.एमपीडीए कायद्यांतर्गंत कारवाईचा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी लातूर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतील धोकादायक पवन सहदेव जाधव, वय 21 वर्ष, राहणार संजय नगर,औसा सध्या राहणार म्हाडा कॉलनी,लातूर याला ‘एमपीडीए’ कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एमपीडीए नुसार करण्यात आलेली ही पाचवी कारवाई आहे. कुख्यात गुंडाविरुद्ध पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात एमपीडीए नुसार कारवाई करण्यात आलेली आहे.
कुख्यात गुंड पवन सहदेव जाधव,यांच्या विरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे पाच गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न, कट रचून-भीती दाखवणे, मालमत्तेचे नुकसान, जबरी चोरी,गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करुन मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे ,बेकायदेशीर जमाव गोळा करुन दहशत करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र वापरणे,चोरी करणे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तसेच तो नेहमी लोखंडी कोयता बाळगून असल्याने जनसामान्यात त्याची भीती होती. त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर)भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे विवेकानंद चौक चे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, यांनी त्यांच्या अधिपत्याखालील सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे, विश्वंभर पल्लेवाड, पोलिस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलिस अमलदार संतोष खांडेकर, सुधीर साळुंखे, बहादूर सय्यद, रमेश नामदास,पांडुरंग सागरे यांनी नमूद आरोपी विरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरी पाठविण्यात आला होता. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर वर्षा ठाकूर घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यावरून सदर आरोपीची 25 जानेवारी रोजी जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
काय आहे एमपीडीए कायदा???
महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ,पायरसी) वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे गुन्हेगार यांच्या विघातक कृतींना प्रतिबंध करण्याविषयीचा कायदा सन 1981 (सुधारणा 1996, 2009 व 2015) अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सातत्याने सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.
सतत गुन्हेगारी कृत्य करणारे गुंड प्रवृत्तीच्या व एकापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या गुंड व्यक्तीं ची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी) सारख्या कठोर कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येत असून यानंतरही लातूर जिल्ह्यातील गुंडगिरी व भाईगिरी वृत्तीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्याकरिता सदरची कार्यवाही करण्यात येणार असून लातूर पोलिसां कडून जिल्ह्यातील धोकादायक गुंड व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या कुख्यात इसमांची माहिती संकलित करण्यात येत आहे.