Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
nitesh rane on lookout circular: ‘अडचणी आमच्या नाही, ठाकरे सरकारच्या वाढणार’; लुकआऊट सर्क्युलरवर नितेश राणेंचा इशारा
हायलाइट्स:
- पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आमदार नितेश राणे आणि नीलम राणे यांच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर.
- यावर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
- आमच्या नाहीत, आता ठाकरे सरकारच्या अडचणी वाढतील- राणे यांचा इशारा.
आमचे बँक खाते मुंबईत असताना पुणे पोलिसांनी लुकआऊट सर्क्युलर पुण्यातून कसे काढले असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. आम्ही घेतलेल्या कर्जाची आम्हाला सेटलमेंट करायची आहे, हे सांगणारे पत्र आम्ही पाच महिन्यांपूर्वीत कंपनीला दिलेले आहे. असे असतानाही हे सर्क्युलर कसे काय काढले, असे सांगताना आता राणे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होणार नसून पुणे क्राइम ब्रँच आणि महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. या प्रकरणी आम्ही लवकरच हायकोर्टात जाणार असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- राणे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ?; नितेश राणे, नीलम राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलर
‘आम्ही ठाकरे सरकारची झोप उडवतोय म्हणून…’
आम्ही सतत भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत आहोत आणि ठाकरे सरकारची झोप उडवत आहोत, म्हणूनच असले प्रकार होताना दिसत असल्याचे नितेश राणे म्हणाले. ठाकरे सरकारला वाटते की असले प्रकार केल्यानंतर आम्ही घाबरून जाऊ, मात्र आमच्या नादी लागू नका, असा फालतूपणा करू नका, असे आवाहनही राणे यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘सत्य पराजित नहीं होता’; महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी मंत्री छगन भुजबळ दोषमुक्त
‘पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंबाबत माहिती देणार’
आमच्या विरोधात लुकआऊट नोटीस काढण्यापेक्षा नंदकिशोर चतुर्वेदी याच्याबाबत लुकआऊट नोटीस काढा. हा नंदकुमार चतुर्वेदी कुठे आहे, असे सांगतानाच तो गेल्या अनेक महिन्यांपासून गायब असल्याचे राणे म्हणाले. या नंदकुमार चतुर्वेदी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा संबंध काय आहे याची माहिती मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, असे सांगतानाच आता आम्ही ठाकरे सरकारला धडा शिकवणार असल्याचे राणे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- भुजबळ दोषमुक्त; दमानिया कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात जाणार