Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘सॅकनिक’च्या अहवालानुसार, फायटरने तिसऱ्या दिवशी २८ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने शुक्रवारी २६ जानेवारीला ३९.५ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे या ॲक्शन ड्रामाचे एकूण कलेक्शन आता ९० कोटींवर पोहोचले आहे. लवकरच हा आकडा १०० कोटींच्या जवळ पोहोचेल.
‘फाइटर’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘फायटर’चा सकाळच्या शोमध्ये १७.०७ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती होती, तर संध्याकाळच्या शोमध्ये तो ३३.५२ टक्क्यांहून प्रेक्षक आलेले. वीकेंडला ‘फायटर’ अधिक प्रेक्षक खेचू शकतो. या चित्रपटाला सर्वच बाजूंनी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे रविवारी त्याच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
‘फायटर’ कशावर आधारीत आहे?
‘पठाण’ आणि ‘वॉर’ फेम सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्य, बलिदान आणि देशभक्तीला श्रद्धांजली म्हणून सादर करण्यात आला आहे. गुरुवारी, २५ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ‘फायटर’ने पहिल्या दिवशी तब्बल २२.२% कमाई केली होती.
‘फायटर’ ची कास्ट
Marflix Pictures निर्मित ‘फायटर’ मध्ये हृतिक रोशन, दीपिका पादुकोण, अनिल कपूर यांच्यासह अक्षय ओबेरॉय, करण सिंह ग्रोव्हर आणि संजीदा शेख यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट एअर ड्रॅगनवर आधारीत आहे, जो श्रीनगर खोऱ्यात दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी सुरू केला जातो. हवाई दलाच्या कमांडोंना खरी श्रद्धांजली म्हणूनही या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘फायटर’चा रनिंग टाइम २ तास ४६ मिनिटे आहे. त्याला U/A प्रमाणपत्र देण्यात आले आहे.