Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मनोज जरांगेची सरसकटची भूमिका होती, ती नंतर सग्यासोयऱ्यांपर्यंत येऊन का थांबली? : आनंद दवे

8

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. यासोबत मराठा आरक्षणासाठी काढलेला आंतरवाली ते मुंबई हा मोर्चा नवी मुंबईत स्थगित केला. राज्य सरकारनं मनोज जरांगे यांना एक राजपत्र प्रकाशित करुन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागं घेतलं. या आंदोलनानंतर नेमकं कोण जिंकलं, कुणाला फायदा झाला याबाबत वेगगेगळे विचारप्रवाह आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठ्यांना काल दिलेलं आरक्षण म्हणजे फसती है दुनिया फसानेवाला चाहिये, कोणतेही आश्वासनपूर्ती न करता हा मोर्चा गुंडाळला गेलायं, असं आनंद दवेंनी म्हटलं.

तेरीभी जय मेरी भी जय असं करत आपण दोघ पण विन विन सिच्युएशन मध्ये येऊ. असं ठरवून केलं गेलयं की कायं असं वाटतं, अशी शंका व्यक्त करत मराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी सरकारच्या भूमिकेवर आनंद दवे यांनी टीका केली आहे.

मराठ्यांना दिलेलं आरक्षण म्हणजे फसती दुनिया फसानेवाला चाहिये असं आहे. मराठा समाजाला यातून काहीही नवीन मिळालेलं नाही, फक्त शब्दछल करण्यात आलेला आहे. या राजपत्रावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत, या हरकतींवर नंतर आक्षेप घेण्यात येतील आणि हे प्रकरण पुन्हा एकदा रेंगाळणार आहे, असं आनंद दवे यांनी म्हटलं.
छगन भुजबळांनंतर नारायण राणे राज्य सरकारच्या निर्णयाशी असहमत, मराठा आणि OBC समुदायाबद्दल ट्विट करत म्हणाले…
मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं अशी मनोज जरांगेची भूमिका होती, ती नंतर सग्यासोयऱ्यांपर्यंत येऊन का थांबली? असा सवाल देखील दवे यांनी केला. जरांगे जाताना ते सांगून गेले की फसवलं तर परत येऊ.. याचा अर्थ असा आहे की त्यांना आता सुद्धा खात्री नाही की आपल्याला व्यवस्थित आरक्षण मिळालयं किंवा मिळतंय, असं आनंद दवे म्हणाले.
बिहारमध्ये पुन्हा सत्तानाट्य; नितीश कुमारांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, INDIAला धक्का
कोणतेही आश्वासनपूर्ती न करता हा मोर्चा गुंडाळला गेला आहे. ‘तेरीभी जय मेरी भी जय असं करत आपण दोघ पण विन विन सिच्युएशन मध्ये येऊ.. असं ठरवून केलं गेलयं की कायं असं वाटतं. आणि मराठा आरक्षणाबाबत येणाऱ्या काळात हिंदू महासंघ योग्य ती भूमिका घेईल, असं देखील आनंद दवे म्हणाले.
बिहारमध्ये लक्ष, मराठमोळा नेता दक्ष; भाजपनं काल दिली जबाबदारी; आजच सत्ता आणण्याची तयारी

मनोज जरांगेंसह मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं कूच, मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.