Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराष्ट्र २०१४ पूर्वी सुसंस्कृत राज्य होतं, मात्र भाजपने द्वेष व आकस वाढवला: संजय राऊत

9

अहमदनगर : मुंबईत दाऊद, छोटा शकील, अबू सालेम, टायगर मेमन ही मंडळी खंडणी, जमीन बळकवणे व दहशत करत होते, परंतु शिवसेना त्यांच्या विरोधात उभी राहिली. तुम्ही गुंड तर आम्हीही महागुंड असे म्हणत त्यांना रस्त्यावर उतरून विरोध केल्याने ते पळून गेले. अशाच पद्धतीने आता नगरमध्येही गुंडगिरी व ताबेमारीविरुद्ध शिवसेना उभी राहणार आहे. नगरची अवस्था बिहारचा छोटा भाग झाल्याचे दिसत आहे. माझ्याकडे नगरच्या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरी विरोधात तक्रारींच्या अनेक फाइल्स आल्या आहेत. राज्यात नवे सरकार आल्यापासून त्यांचे गुंडाराज वाढले आहे, असा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता निशाणा साधला. या आमदाराच्या घरावर व जिल्हा प्रशासनावर माझ्या नेतृत्वाखाली मी महाविकास आघाडीचा मोर्चा काढणार आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला.

नगरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यानिमित्त राऊत नगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, माजी आमदार विजय औटी, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसुंदर, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, उपनेते साजन पाचपुते तसेच योगीराज गाडे, अशोक गायकवाड, दत्ता जाधव, अशोक दहिफळे आदी उपस्थित होते.

राऊत म्हणाले, नगरचे आमदार महाविकास आघाडी सरकारसोबत होते. मात्र, राज्यातील नव्या सरकारसमवेत आता ते आहेत व त्या सरकारच्या पाठबळामुळे ते नगरमध्ये गुंडगिरी व ताबेमारी करीत आहेत. नगरमधील गुन्हेगारीवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे त्यांचा कोण बॉस आहे हे स्पष्ट होऊ द्या. महाराष्ट्रात गृहमंत्री आहे की नाही? मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांचे पोशिंदे तर नाहीत ना? असा प्रश्न पडतो, असेही राऊत म्हणाले.
बिहारमध्ये पुन्हा सत्तानाट्य; नितीश कुमारांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, INDIAला धक्का
एकीकडे राम राम म्हणत मार्केटिंग करायचे व दुसरीकडे देवस्थानच्या व शैक्षणिक संस्थांच्या जमिनी, भूखंड, शिवसेना नगरसेवकांची कामे लुटली जात आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही तक्रारी केल्या आहेत. व्यापाऱ्यांनीही तक्रारी केल्या आहे व्यापार करणे त्यांना मुश्किल झाले आहे. शहर सोडण्याची भाषा ते करीत आहेत आणि तिकडे भाजप नैतिकतेच्या गोष्टी करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नगरमधील आमदाराच्या ताबामारीवर छापामारी कधी करणार, असा सवाल करून राऊत म्हणाले, नगरमधील ही तांबेमारी थांबली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. मुंबईत गुंडगिरीविरुद्ध जशी लढली व संघर्ष केला, तसाच नगरमध्ये केला जाईल. आमदाराच्या घरावर व जिल्हा प्रशासनावर विराट मोर्चा काढला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नगरचे माजी आमदार अनिलभैया राठोड यांनी गुंडगिरी व झुंडशाही विरोधात टक्कर दिली आहे. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना पोरकेपणा जाणवत आहे. मात्र भैय्यांचा विधानसभेत पराभव का व कसा घडवला गेला, हे आम्हाला माहीत आहे, असेही भाष्य राऊत यांनी केले.
मराठ्यांना दिलेलं आरक्षण म्हणजे फसती है दुनिया फसानेवाला चाहिये,आश्वासन पूर्ण न करता मोर्चा गुंडाळला: आनंद दवे
२०१४ पूर्वी महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य होते. मात्र, भाजपने राज्यात द्वेष व आकस वाढवला आहे. राजकीय विरोधकाला शत्रू मानून त्याला कुटुंबासह संपवण्याचे घातक राजकारण दिल्लीतील भाजप करीत आहे. द्वेष, सूड, बदला असे प्रकार मागील दहा वर्षापासून वाढले असून भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळे फासले आहे, असा दावाही राऊत यांनी केला.
बिहारमध्ये लक्ष, मराठमोळा नेता दक्ष; भाजपनं काल दिली जबाबदारी; आजच सत्ता आणण्याची तयारी

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.