Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- शरद पवारांची काँग्रेसवर टिप्पणी
- देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया
- काँग्रेसला लगावला टोला
आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो. तशीच काहीशी स्थिती आहे, असे मत शरद पवारांनी एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं होतं. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत काँग्रेसचा खोचक टोला लगावला आहे.
वाचाः लालबागमधील परिस्थीती नियंत्रणाबाहेर गेल्यास…; नांगरे पाटलांनी दिला इशारा
आज देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील घरी बाप्पाचं आगमन झालं. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही. आत्ता काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगत आहे. वऱ्हाडात असं म्हणतात की मालगुजरी तर गेली, पण उरलेल्या मालावर आता गुजराण सुरू आहे. तशा प्रकारचं वक्तव्य पवार साहेबांनी केलंय. ते काँग्रेसवर चपखलपणे लागू होतंय, असा टोमणा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
वाचाः …अन्यथा ठाकरे सरकार पडेल; अण्णा हजारेंनी दिला निर्वाणीचा इशारा
फक्त महाराष्ट्रात मंदिरे बंद का?
मंदिरं सुरू करण्याची आमची मागणी आहे. आम्ही हिंदू आहोत. आमचे ३३ कोटी देव आहेत. जिथे आम्ही मानू, तिथे आमचे देव आहेत. पण या मंदिरांवर अवलंबून असणारे लाखो लोक आहेत. कुणी फुलं विकतं, कुणी उदबत्ती विकतं, कुणी प्रसाद विकतं, हळद-कुंकू विकतंय. मंदिरांवर अवलंबून असणारे पुजारी, सेवक आहेत. गेल्या दोन वर्षांत या लोकांची विदीर्ण अशी अवस्था झाली आहे. म्हणून आम्ही मागणी केली की मदिरालय सुरू होऊ शकतं, तर मंदिरं का सुरू होऊ शकत नाहीत? सोशल डिस्टन्सिंगचे नियम नक्कीच पाळले जावेत. पाळले नाही तर कारवाई करावी. देशभरात सर्व राज्यांमध्ये मंदिरं सुरू आहेत, फक्त महाराष्ट्रात मंदिरं बंद आहेत. त्यामुळे सगळ्यांना गणरायांनी सुबुद्धी द्यावी, तशी सुबुद्धी सरकारलाही लाभू देत, असं फडणवीस म्हणाले आहेत.
वाचाः राज्यसभेवर राजीव सातव यांच्या जागी कोणाची वर्णी?; काँग्रेसमधून ‘ही’ नावे चर्चेत