Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विधाते यांनी म्हटले आहे, नगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेताजी सुभाष चौकातील लोढा हाईट्सवर तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी अनेक वर्षांपासून ताबा मारलेला आहे. काही गाळ्यावर नगर अर्बन बँकेचे कर्ज आहे. या इमारतीवरील शिवसेनेच्या नेत्याचा ताबा सोडल्यास कित्येक गोरगरीब लोकांचे पैसे बँक देऊ शकेल. त्यामुळे तुम्ही अशा ताबेमार शिवसेनेच्या नगर मधील नेत्यांना आधी ताबा सोडण्यास सांगा. आम्ही नगरमध्ये जबरदस्तीने जागा बळकावल्याचे एक तरी प्रकरण साक्षी पुराव्यानिशी आमच्या समोर आणावे, असे आव्हान विधाते यांनी दिले.
परंतु तुमच्या रिकामटेकड्या बोल घेवड्या कार्यकर्त्यांनी खोटेनाटे सांगून तुमचे कान भरले. त्यांचे ऐकून तुम्ही कोणतीली शाहानिशा न करता आमच्या नगर शहर विकासाच्या भाग्यविधाते युवा नेतृत्वावर टीका करीत असाल तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही. निवडणुकच नाही तर खुल्या मैदानात तुम्हाला चारी मुंड्या चीत करण्याची धमक नगरकरांमध्ये आहे, हे लक्षात असू द्या. तुम्हाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासाठी सभागृहातील खुर्च्या भरविण्यासाठी रोजंदारीवर माणसे का आणावी लागली, याचे आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही विधाते यांनी दिला.
विधाते यांनी पुढे म्हटले आहे, ताबेमारी विषयी बोलत असताना तुम्ही किती मोठे गुंड आहात. शिवसेनेचा जन्मच ताबेमारीतून झाला हे तुम्ही भर सभेत मान्य करता. या तुमच्या अशा थुकरट वक्तव्यातून तर तुम्ही आपल्या पक्षाची वाट लावली. तुम्हाला कंटाळून तुमच्या पक्षाचे नेते तुमच्या पक्षाला जय महाराष्ट्र करून गेले आणि आता तुम्ही नगरमध्ये रस दाखवत आहात. पत्रा चाळीची पुनरावृत्ती करण्यासाठी नगरमध्येही तुम्ही म्हाडाची जमीन शोधून ठेवली आहे का? की सन २०१९ सारखी आणखी धूळधाण तुम्हाला या निवडणुकीत करून घ्यायची आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे आपले कुठे चुकते याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी दुसऱ्याचे ऐकून तिसऱ्यासंबंधी बोलण्याचा प्रकार नगरकरांची करमणूक करणारा आहे. अशी गंमत पुढच्या काळात तुम्हाला आणखी महागात पडेल, असा इशाराही विधाते यांनी दिला आहे.
नगर शहर हे शांत शहर आहे. सर्वधर्म समभाव जपणारे आहे. शहराची शांती अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. ते बिघडवण्याचे काम तुम्ही करू नका. विकासाच्या नावाने कलंकित ५ टर्म नगर शहराने ज्या नरक यातना भोगल्या आहेत. त्यामुळे पुढच्या दोन टर्म नगरकरांनी तुम्हाला नाकारले ही वस्तुस्थिती आहे, असे सांगत माजी आमदार अनिल राठोड यांच्या कारकिर्दीवरही विधाते यांनी टीका केली आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News