Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोबाईल शॅापी फोडनार्या सराईत चोरट्यास चाळीसगाव रोड पोलिसांनी २४ तासात केली अटक…

8

मोबाईल शॉप फोडणा-या सराईत आरोपीला 24 तासाचे आत केले जेरबंद,चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनची कार्यवाही….

धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.25/01/2024 रोजी फिर्यादी मोहम्मद शोएब शौकत अली अन्सारी रा. सहारा हॉस्पीटल समोर, कसवा डेअरीचे बाजुला, 100 फुटी रोड, धुळे यांनी तक्रार दिली की, दि.23/01/2023 रोजी फिर्यादी हे नेहमी प्रमाणे सकाळी 10.30 वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाचे शटरचे कुलूप दिसून आले नाही तसेच दुकानातील कॉऊन्टर ड्रॉवर मध्ये विक्रीसाठी ठेवलेले नविन मोबाईल, एअरपॅाड, स्मार्ट वॉच व रिचार्ज करण्यासाठी ते  वापरत असलेला मोबाईल मिळून आला नाही म्हणुन फिर्यादी यांची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरटयाने मोबाईल दुकानाचे पत्रटी शटरचे कुलूप तोडून दुकानाच्या आत प्रवेश करुन दुकानातील एकूण 54,740/रु चे  मोबाईल व इतर साहित्य चोरुन नेले आहे. त्यावरुन चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला  गुरंन 27/2024 भा.दं.वि कलम 454,457 380 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला होता व तपास सुरु असतांना दि.26/01/2024 रोजी ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक जिवन बोरसे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वडजाई रोड येथे एक अनोळखी इसम हा नविन मोबाईल विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सपोनि जिवन बोरसे यांनी पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असलेल्या पेट्रोलिंग मोबाईलला संपर्क साधून त्यांना मिळालेल्या बातमीची हकिकत सांगितल्याने पेट्रोलिंग मोबाईलवरील अंमलदार हे तात्काळ अपनी हॉटेल जवळ शासकीय वाहन उभे करुन तेथुन पुढे निब्यांचे खेत कडे पायी जात असतांना निळया रंगाचे शर्ट व आकाशी रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला इसम शाही मॅरेज हॉल गेट जवळ उभा असलेला दिसला त्याचे दिशेने जात असता तो पोलिसांना  पाहुन पळायला लागला लगेच त्यावर झडप घालुन  पोलिस शिपाई योगेश पाटील यांनी त्यास पकडले त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव

अरबाज ऊर्फ बबलु रफिक शेख रा.बोरसे कॉलनी, चौधरी पेट्रोल पंप मागे, धुळे

असे सांगितल्याने त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देवू लागल्याने तेथे हजर असलेल्या दोन इसमा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे डाव्या खिशात
दोन मोबाईल मिळून आल्याने त्यास मोबाईलचे बिल पावती बाबत अधिक विचारपूस केली असता काही एक समाधानकारक माहिती दिली नाही म्हणुन त्यास अधीक  चौकशी करीता पोलिस स्टेशनला आणून त्याचे अंगझडती मिळून आलेल्या मोबाईल बाबत माहिती घेतली असता तो चाळीसगाव रोड पो.स्टे गुरंन 27/2024 भा.दं.वि कलम 454, 457, 380 मधील चोरीस गेलेल्या मुद्येमाल मधील असल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्हयातील आरोपी यास गुन्हयातील इतर मुद्देमालाबाबत अधिक विचारपूस करता त्याने अशी माहीती दिली की त्याने सदरची चोरी केली असुन अशा कबुलीवरुन सदर गुन्ह्यांत  चोरीस गेलेला उर्वरीत मुद्देमाल हा त्याचेकडून हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी धुळे शहर विभाग एस ऋषिकेश रेड्डी    सचिन हिरे उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरपुर विभाग, शिरपुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली  ठाणेदार सपोनि जिवन बोरसे, पोहवा रवि ठाकुर,पाथरवट, अविनाश वाघ,पोशि विनोद पाठक, योगेश पाटील,अतिक शेख,शोहेल बेग,देवेंद्र तायडे  केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.