Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शंभुराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नात जयंत पाटील आणि अजितदादा पवार समोरासमोर आले. मात्र, त्यांनी एकमेकांशी बोलण टाळलं. त्यांचा हा अबोला सर्वांच्या नजरेत भरला. स्वाभाविकपणे नेहमीच हात जोडून नमस्कार करणारे दोन्ही नेते मात्र या सोहळ्यात दिसले नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीमुळे अजितदादा गट आणि शरद पवार गट असा गट अस्तित्वात आला. त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. यात प्रत्येकाने आपापली बाजू मांडताना एकमेकांवर तोंडसुखही घेतलं. या राजकीय सारीपाटात काही वेळा आरोप प्रत्यारोप करताना एकमेकांविषयी बोलणे टाळले. मात्र, आज महाराष्ट्रातील निम्म्याहून जास्त मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित असताना आणि आमदार, खासदार, कार्यकर्ते असतानाही या दोघांनी समोरासमोर येऊनही एकमेकांना राम राम करणे टाळलं. ही गोष्ट उपस्थित राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांच्या नजरेतून सुटली नाही, याची खमंग चर्चा विवाहस्थळी सुरू होती.
राजकीय आशा आकांक्षांनी भरून पावलेले हे नेते मनाने किती दूर गेले आहेत, हे प्रकर्षाने जाणवले. आता सत्तांतराच्या सारीपाटात हा झालेला दुरावा आणि मनात असलेल्या मनीषा पूर्ण होण्यासाठी एकेकाळचे मित्रही कसे दूर जातात हा संदेश देणारा हा प्रसंग राजकारणातील माणुसकीची दिशा बदलणारा ठरत आहे.
त्यातच सोहळ्याला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र जयंत पाटील यांच्या जवळ जात विचारपूस केली. संभाजीराजे छत्रपती यांनादेखील एकनाथ शिंदे आणि आग्रहाने जवळ बसवून घेत विचारपूस करत कानगोष्टी केल्या.
या लग्नात भाजप आणि शिवसेनेच्या ( शिंदे गट) मंत्र्यांची मांदियाळी पाटणमध्ये पाहायला मिळाली. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, खासदार श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले, श्रीकांत शिंदे, संजय कदम, आमदार शहाजीबापू पाटील, अनिल बाबर, बालाजी कल्याणकर, विक्रम काळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील, ज्ञानोजीराजे चौगुले, रणजितसिंह मोहिते, माजी आमदार विजय शिवतारे, के. बी. पाटील, प्रभाकर घार्गे, मदन भोसले यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News