Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अट्टल मोटारसायकल चोरट्यांना धुळे LCB पथकाने शिताफिने केली अटक…
धुळे (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. या मध्ये खास करून मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. तेव्हा कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक, धुळे यांनी धुळे परिसरात होणारे मोटार सायकल चोरीचे गुन्हे ट्रॅप लावुन उघडकीस आणणेकरिता स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. म्हणुन एलसीबी पथकाने जलदगतीने तपास तपास करत अट्टल मोटारसायकल चोरट्यांना अटक करून त्यांच्या कडून १० मोटार सायकल, ज्यांची एकुण किं. ४,३०,०००/- रु. या जप्त केल्या आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.२८जानेवारी) रोजी तक्रारदार रविंद्र देवीदास मराठे (वय ३६वर्षे), व्यवसाय शेती रा.मु.पो. दहयाने ता.जि. धुळे यांनी धुळे शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, (दि. २६जानेवारी) रोजी रात्री ०९.३० ते १०.३० वाजेच्या दरम्यान हिरे मेडीकल कॉलेज, धुळे येथुन त्यांच्या मालकीची हिरो कंपनीची स्पेलन्डर मोटारसायकल क्र. एम.एच. १८ ओ.ई. ५७९२ ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन धुळे शहर पोलिस ठाणे येथे गुरनं ३७/२०२४ भादवि क.३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
यासारख्या मोटार सायकल चोरीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत होते. म्हणून पोलिस अधीक्षक, धुळे यांनी सिव्हील हॉस्पीटल, धुळे परिसरात होणारे मोटार सायकल चोरीचे गुन्हे ट्रॅप लावुन उघडकीस आणणेकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांचे पथकास योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्यांचे पथकास सिव्हील हॉस्पीटल परिसरात वेळोवेळी ट्रॅप लावुन तेथे फिरणारे संशयीत तरुणांवर लक्ष ठेवणे बाबत सुचना दिल्या.
त्यानुसार मिळालेल्या गुप्त बातमीव्दारे मार्फत बातमी मिळाली की, (दि.२८जानेवारी) रोजी सदर गुन्हयातील संशयीत इसम नामे कफिल अहमद शकील अहमद अन्सारी याने व त्याचा साथीदार नामे तौसिफ शेख गुलाम मोहम्मद याचे मदतीने केला असुन त्यांनी चोरी केलेली मोटर सायकल क्र. एम.एच. १८ ओ.ई. ५७९२ सह वडजाई रोड चौफुली सना मॅरेज हॉलजवळ उभे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी लागलीच त्यांच्या पथकास बातमीची खात्री करुन पुढील कारवाई करणे बाबत आदेशीत केले.
सदर पथकाने वडजाई रोड चौफुली जवळील सना मॅरेज हॉल जवळ गेले असता तेथे इसम नामे
१) कफिल अहमद शकील अहमद अन्सारी (वय २०वर्षे), व्यवसाय मजुरी रा. मौलवीगंज, कलंदर चौक, एकबाल रोड, धुळे
२) तौसिफ शेख गुलाम मोहम्मद (वय ३२वर्षे), व्यवसाय मजुरी रा. तिरंगा चौक, अन्सार नगर, मशिद जवळ, धुळे
असे त्यांचे ताब्यातील मोटर सायकल क्र. एम.एच. १८ ओ.ई. ५७९२ सह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले. सदर इसमांना त्यांचे ताब्यातील मोटर सायकल बाबत विचारपुस करता त्यांनी सदर मोटर सायकल सिव्हील हॉस्पीटल, (हिरे मेडीकल कॉलेज) धुळे येथुन चोरी केली असल्याबाबत सांगितले. आरोपी कफिल अहमद शकील अहमद अन्सारी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपुस करता, त्याने
तौसिफ शेख गुलाम मोहम्मद व ३) अनिस ऊर्फ अनिस फारकेट अकबर मन्यार रा. दिलदार नगर, धुळे
व त्याचे साथीदार यांच्या मदतीने हिरे मेडीकल कॉलेज व धुळे शहरातुन यापुर्वी मोटार सायकली चोरी केल्याचे कबूल केल्या असल्याचे कबुल केले
या मध्ये १० मोटारसायकल, एकुण ४,३०,०००/- रु. किं
आरोपी १) कफिल अहमद शकील अहमद अन्सारी
२) तौसिफ शेख गुलाम मोहम्मद
३) अनिस ऊर्फ अनिस फारकेट अकबर मन्यार
व त्याचे इतर साथीदार यांचे ताब्यात मिळुन आल्याने त्यांना मुद्येमालासह गुन्हयाचे पुढील कारवाई साठी धुळे शहर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई श्रीकांत धिवरे पोलिस अधीक्षक, धुळे, किशोर काळे, अपर पोलिस अधिक्षक धुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोउपनिरीक्षक अमरजित मोरे, प्रकाश पाटील,कैलास दामोदर, असई. संजय पाटील, श्याम निकम, पोहवा मच्छिद्र पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, संतोष हिरे, संदीप पाटील, योगेश चव्हाण, अशोक पाटील, प्रकाश सोनार, प्रल्हाद वाघ, तुशार सुर्यवंशी, योगेश साळवे, गुणवंत पाटील, सुशिल शेंडे आदींनी केली आहे. तसेच पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ज्यांच्या मोटार सायकल चोरीस गेलेल्या आहेत त्यांनी प्रभारी अधिकारी, धुळे शहर पोलिस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा असे नागरीकांना अवाहन केलेले आहे.