Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम राज्य सरकारतर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण, शहरी भागातील मराठा समाज व खुल्या समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया मुंबईमध्ये महापालिकेकडून वेगाने सुरू आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी मुंबईत महापालिका शाळांतील शिक्षक, बीएमसी कर्मचाऱ्यांवर आहे. हे कर्मचारी शासनाने ठरवून दिलेले प्रश्न नागरिकांना विचारतच आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याने सर्व्हेक्षणादरम्यान जात विचारल्याचा राग मनात ठेवून अभिनेता पुष्कर जोग याने समाज माध्यमांत वादग्रस्त पोस्ट लिहिली. याच पोस्टविरोधात सुजान नागरिकांसह मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदविले आहेत.
पुष्कर जोग याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, मुंबई महापालिका कर्मचारी संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
पुष्कर जोग याने दिलेली धमकी गंभीर स्वरूपाची असून या अनुषंगाने शासनाने तातडीने कारवाई न केल्यास, विविध समाजघटक वा व्यक्तींना अशा वर्तनाने प्रोत्साहन मिळून त्या सर्वांचा परिणाम सर्वेक्षणाच्या कामकाजावर होईल, तसेच यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून, तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पुष्कर जोग याचे हे वर्तन अतिशय अक्षम्य असून, त्याच्या विरोधात कठोर कारवाई अपेक्षित आहे.
पुष्कर जोग याने सर्वेक्षणाचे कामकाज करणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यां मारहाणीची धमकी देऊन त्यांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच सर्वेक्षणाच्या कामकाजापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. या अनुषंगाने पुष्कर जोग याच्याविरोधात गंभीर स्वरुपाची फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र ‘दि म्युनिसिपल युनियन’ या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.
शासनाने कारवाई करावी अन्यथा मूकसंमती आहे असं समजू….
शासनाने दिलेले काम आम्ही करत आहोत. आमच्यावर दादागिरी करण्यापेक्षा ज्या शासनाने आम्हाला हे काम करण्यास सांगितले आहे, त्यांनाच पुष्कर जोगने प्रश्न विचारावेत. एका महिलेला लाथेला मारण्याची भाषा करणाऱ्या पुष्कर जोगविरोधात शासनाकडून तीव्र कारवाईची अपेक्षा आहे. जर शासनाने कारवाई केली नाही तर आम्ही शासनाची पुष्कर जोगला मूक संमती आहे असं समजू, अशा तीव्र भावना मुंबई महापालिकेच्या शाळेतील एका मुख्याध्यापिकेने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘मटा’कडे व्यक्त केल्या.
पुष्कर जोग याची समाज माध्यमांमधली पोस्ट काय होती?
काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणा