Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लोणावळ्यात विकास कामे रेंगाळली; कामांना गती देण्यासाठी आरपीआयचा नगरपरिषदेवर घंटानाद मोर्चा

7

बंडू येवले
लोणावळा: लोणावळ्यातील डॉ. बाबासाहेब डाहणूकर रुग्णालयाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या जागेवरील पार्किंगचा विषयासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण, लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणे, अनेक वर्षांपासून प्रलंबित व खितपत पडलेल्या ‘रोप- वे’चा प्रकल्प, तुंगार्ली डॅम परिसरातील मनोरंजन नगरी तसेच अनेक वर्षांपासून रेंगाळलेला भांगरवाडी नांगरगाव रेल्वे उड्डाणपूल या प्रमुख विषयांसह लोणावळा शहराच्या सर्वांगिण विकासाची अनेक कामे रेंगाळली आहेत. कामे खितपत पडल्याने हे विषय मार्गी लावण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेवर सोमवारी दुपारी मोठ्या संख्येने घंटानाद मोर्चा काढण्यात आला.

तसेच येत्या १५ दिवसांत संबंधित विकास कामांच्या संदर्भात न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांनी दिला आहे. आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहरातील कुमार चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा, तेथून लोणावळा नगरपरिषद कार्यालय आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मोठ्या संख्येने घंटानाद मोर्चा काढण्यात आला. यावेळी आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्ष यमुना साळवे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, शहराध्यक्ष कमलशील म्हस्के, माजी नगरसेवक दिलीप दामोदरे आदींसह पक्षाचे आजीमाजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉक्टर दांपत्यात कडाक्याचं भांडण; पत्नीनं थेट घरालाच लावली आग, इमारतीतील लोकांची धावपळ
या मोर्चाच्या अग्रभागी असलेल्या एका मोठा घंटा वाजवत विविध मागण्यांच्या संदर्भात घोषणाबाजी करत मोर्चा नगरपरिषद कार्यालयासमोर आल्यावर जोरदार घंटानाद करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्विकारले. तसेच या सर्व मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. लोणावळा शहरात चालु असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभिकरणाच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्यातील कामाच्या निविदा १५ दिवसात प्रसिध्द करून सुशोभिकणाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

१५ दिवसांत निविदा न काढल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम त्वरित करणे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची परवानगी राज्यशासनाकडून मिळवून पुतळ्याच्या कामाची पुर्तता करणे, बापदेव मंदिराकडील रस्त्याने खोदकाम केलेले आहे. ते त्वरीत दुरुस्त करण्यात यावे, पंतप्रधान आवास योजनेत रखडलेली कामे पूर्ण करणे, लोणावळ्यात पे ॲन्ड पार्किगची व्यवस्था करणे, पार्किंगच्या नावाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जागा पार्किंग साठी वापर करु नये. तुंगार्ली डॅम परिसरात मनोरंजन नगरी उभी करण्यात यावी.

कायदा बनलाय, जवळपास आरक्षण मिळालंय, मराठे जिंकून आलेत : मनोज जरांगे पाटील

लोणावळा खंडाळा रोप वे व खंडाळा लेक बोटींगचे काम विना विलंब सुरु करणे. लोणावळ्यात वाहतुकीस अडचण येते म्हणून हटविलेल्या टपऱ्यांचे तातडीने पुर्नवसन करणे, संत रोहीदास महाराज व महर्षी वाल्मिकी आणि मौलाना आझाद यांच्या नावाने लोणावळा नगरपालिकेच्या वतीने सभागृह उभारणी करण्यात यावी. वलवण तलावाचे सुशोभिकरण करून स्थानिक भुमीपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन देणे. सर्व मागासवर्गीय वस्त्यामध्ये बुध्दविहार (सभागृहाचे) कामकाज त्वरीत सुरु करण्यात यावे.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, रायवुड या उद्यानाचा जलदगतीने विकास करणे. लोणावळ्यात पिंपरी चिंचवडच्या बस थांबतात त्याठिकाणी निवारा शेड उभारणे, पुणे मुंबई महामार्गा लगत खंडाळा ते वलवण दरम्यान वारकरी भवन बांधण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यासमोरील रेल्वेच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचे तैलचित्र लावण्यात यावे, अशा विविध विकासकामांच्या संदर्भात आरपीआयच्कया वतीने हा घंटानाद मोर्चा काढण्यात आला होता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.