Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मराठा आरक्षण : पदापेक्षा जात-धर्म-देश महत्त्वाचा, नारायण राणेंचा रोख मुख्यमंत्र्यांकडे?

10

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : आरक्षण हा नाजूक प्रश्न असून, त्याचा सरकारने सखोल विचार करावा. कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एवढेच मला सांगावेसे वाटते, असा सूचक इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी दिला. त्यांचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. नारायण राणे यांनी ट्वीट करून सूचक इशारा देतानाच यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार नसल्याचेही स्पष्ट केले.

पदापेक्षा जात-धर्म-देश महत्त्वाचा

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला घेरताना यासंदर्भात ट्वीट करून प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा आरक्षण या विषयावर आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद रद्द करण्‍यात येत आहे. या विषयावर मला महाराष्‍ट्र शासनाला विनंती करावयाची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण होणार नाही, याची काळजी घ्‍यावी. स्‍वाभिमानी मराठा, कुणबी समाजामध्‍ये समाविष्‍ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्‍याने इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार असल्याचेही राणे यांनी म्हटले आहे. या सगळ्या नाजूक प्रश्‍नाचा महाराष्‍ट्र सरकारने सखोल विचार करावा. महाराष्‍ट्रामध्‍ये मराठा समाजाची संख्‍या ३२ टक्‍के म्‍हणजे ४ कोटी एवढी आहे. कोणत्‍याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्त्वाचे आहेत एवढेच मला सांगावेसे वाटते, असे सूचक विधानही राणे यांनी केले आहे.

गंभीर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करू, अभिनेता पुष्कर जोगवर BMC कर्मचारी संतापले
‘सत्तेतून बाहेर पडून मग विरोध करा’

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे आणि छगन भुजबळ हे दोन्ही नेते सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाला विरोध करत आहेत. हे फक्त मतासाठी विरोध करत आहेत. नारायण राणे आणि छगन भुजबळ या दोघांनी सत्तेतून बाहेर येऊन भूमिका मांडली पाहिजे, अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही राणे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नारायण राणे यांच्या कोकण विभागात वेगळे समीकरण आहे. त्यामुळे त्यांच्या राजकारणासाठी त्यांनी ती वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र, कुणबी नोंदी इतरत्र सर्वांना आवश्यक होत्या. या आंदोलनात सर्व लोक उपस्थित होते. नेत्यांना बाजूला काढून हे आंदोलन झाले. न्याय मिळाला. त्यामुळे त्यांच्या पचनी पडत नाही, असा चिमटा शिरसाट यांनी काढला.

नारायण राणेंना भेटून सांगतो, जरा तुमच्या पोराला आवरा; नरसय्या आडम भडकले

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.