Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
याबाबत पोलिस तपास काही माहिती समोर आली असून वंदना आणि ऋषभ हे दोघेही लखनऊ येथील राहणारे असल्याने महाविद्यापासून एकामेकावर नितांत प्रेम करणारे. वंदनाने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन ती पुढे कामानिमित्त पुण्यातील हिंजवडी येथे आली होती. ऋषभ हा लखनऊमध्ये ब्रोकर म्हणून कार्यरत होता. वंदनाला हिंजवडीतील मोठ्या कंपनीत जॉब लागल्याने ती पुण्यात आली होती आणि ती एका होस्टेलमध्ये रहात होती. तरी देखील दोघेजण एकमेकांच्या नेहमी संपर्कात असायचे.
मात्र, काही दिवसात वंदना माझ्याशी पहिल्या सारखे बोलत नाही, तिच्या आयुष्यात दुसरं कुणी तर आले नाही ना? असा संशय ऋषभच्या मनात बळावू लागला होता. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यात असे वाद सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ऋषभला तिच्या बोलण्यावर संशय वाटायचा. मात्र वंदना ही आयटीत काम करत असल्याने ती कामावरून आली की थकून जायची आणि झोपून जायची. मात्र, या गोष्टी ऋषभ याला न पटणाऱ्या वाटत होत्या.
शेवटी तो २५ जानेवारीला पुण्यात आला. त्याने हिंजवडी येथी ओयो टाउनशिपमध्ये रूम देखील बुक केली. २६ तारखेला वंदना ऋषभाला भेटण्यासाठी आली. मात्र ती त्या दिवशी मुक्कामी थांबली नाही. ही गोष्ट ऋषभला खटकली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी २७ जानेवारी रोजी त्याने वंदना हिला पुन्हा भेटण्यासाठी बोलावून घेतले. त्या दिवशी ते दिवसभर फिरले, जेवण केले, पुरेसा वेळ एकमेकांसोबत घालवला. त्यानंतर ते दोघे पुन्हा रूमवर गेले. त्यानंतर ऋषभने वंदनाला काही कळायच्या आत तिच्या डोक्यात आणि तिच्या शरीरावर पाच गोळ्या झाडल्या. त्याने रागाच्या भरात हे कृत्य केले होते. त्यानंतर काही घडलेच नसल्याच्या आविर्भावात तो शांतपणे रुमच्या बाहेर पडला आणि पसार झाला.
मात्र, मुंबईच्या दिशेने जात असताना नाकाबंदी वेळी पोलिसांना त्याच्या हालचालींवर संशय आला तेव्हा पोलिसांनी त्यांची तपासणी केली तेव्हा त्याच्याकडे बंदूक आढळली. तेव्हा पोलिसांना त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी हिंजवडी पोलिसांना कळवले आणि या हत्येचा उलगडा झाला. ऋषभ याच्याकडे सापडलेली पिस्तूल ही त्याने त्याच्या मित्राकडून चार वर्षांपासूनच घेतलेली होती, असे माहिती समोर आले आहे. ऋषभला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र, अभियांत्रिकी तरुणीची निघृण हत्या झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.