Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वडिलांसोबत निघाला अन् बेपत्ता झाला, मग मुलाची बॉडी सापडली, खरं कळताच आईला धक्का

7

सोलापूर: शाळेत आणि घरात अभ्यास न करता सतत खोड्या करतो, शाळेत उध्दट वागणुकीबद्दल नेहमीच तक्रारी, सतत मोबाईल पाहणे, मोबाईलमध्ये ब्लु फिल्म पाहतो यामुळे संतापलेल्या पित्याने आपल्या १४ वर्षांच्या मुलाला विष पाजून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. एरव्ही थंड आणि मवाळ स्वभाव असलेल्या पित्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, हे जाणून पोलिस यंत्रणाही अवाक् झाली आहे. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत क्रूर पित्याची रवानगी करण्यात आली असून आणखीन कसून तपास जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहेत. विशाल विजय बट्टू (वय १४ वर्षे) असं मृत मुलाचे नाव आहे. विजय सिद्राम बट्टू असे क्रूर पित्याचे नाव आहे.

सुरुवातीला विशाल बेपत्ता झाल्याची नोंद, नंतर त्याचा मृतदेह आढळला होता

सोलापूर शहरातील तुळजापूर रस्त्यावर सर्व्हिस रोडवर नाल्यालगत निर्मनुष्य ठिकाणी हा भयंकर प्रकार घडला होता. विशाल १३ जानेवारी रोजी सकाळपासून घरातून बेपत्ता झाला होता. विशालची आई आणि पिता विजय यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. त्याच दिवशी रात्री तो सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील सर्व्हिस रोडजवळील नाल्यालगत मृतावस्थेत सापडला होता. जोडभावी पेठ पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करीत तपास हाती घेतला.

दिवसभर फिरले, जेवले, रुमवर गेले अन्… पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या हत्येमागील धक्कादायक सत्य
शवविच्छेदन अहवालात विशालला विष दिल्याचं स्पष्ट झालं

जोडभावी पेठ पोलिसांनी विशालचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. न्याय वैद्यक तपासणी अहवालात विशाल याच्या शरीरात सोडिअम नायट्रेट नावाचे विष आढळून आल्यामुळे पोलिसांना हा खुनाचा प्रकार दिसून आला. पोलिस निरीक्षक अजय जगताप यांनी तपास करताना विशाल याच्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि शेजारच्या मंडळींकडे चौकशी केली. यात विशाल याचे वडील विजय बट्टू यांनी दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून येत होती.

वडील विजयला पश्चाताप होत होता

विशाल बट्टू (वय १४ वर्ष) या नववीत शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलाचा खून करून विजयला पश्चाताप होत होता. पत्नी कीर्ती बट्टू ही मानसिक धक्क्यात होती. घरातील वातावरण तणावपूर्ण होते. अखेर २८ जानेवारी रोजी रात्री विजय बट्टू याने पत्नी समोर बोलून दाखवले. विशाल शाळेत अभ्यास न करता उलट इतरांना त्रास द्यायचा. त्याबद्दल शाळेतून सतत तक्रारी येत होत्या. घरातही तो उध्दट वागत होता. सतत मोबाईल पाहण्यात गुंग असायचा. मोबाईल मध्ये ब्लु फिल्म पाहत होता. कितीही समजावून सांगितले तरी त्याच्या वागण्यात बदल होत नव्हता. त्यामुळे संतापून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

विजय यांनी विशालला १३ जानेवारी रोजी सकाळी दुचाकीवर बसवून तुळजापूर रस्त्यावर नेले आणि त्यास एका थम्सअप या शीतपेयातून सोडिअम नायट्रेट विषारी पावडर मिसळून पाजले. त्यामुळे विशाल थोड्याच वेळात बेशुध्द पडला आणि हे कृत्य करून विजय थंड डोक्याने घरी परतले. हा किस्सा ऐकून विशालची आई कीर्ती यांना जबर धक्का बसला. कीर्तीने नातेवाईकांना सोबत घेऊन जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला.

पोलिसांनी ताबडतोब विजयला ताब्यात घेऊन तपास सुरू केला

जोडभावी पेठ पोलिसांनी ताबडतोब विजय बट्टू याला ताब्यात घेऊन कसून चौकशीस सुरुवात केली. अखेर त्याने आपला मुलगा विशाल याचा खून आपण स्वतः केल्याची कबुली दिली. विजय हा शिवणकामाचा व्यवसाय करतो. तो पत्नीसह मुलगा आणि मुलगी यांच्यासह भवानी पेठेत राहतो.पोटच्या मुलाला कशा प्रकारे ठार केले याची कबुली देताच पोलिसांना देखील जबर धक्का बसला.पोटच्या लेकराला बापानेच असे भयानकरित्या संपविल्याने पोलीसही हळहळले.शाळेतील खोडकर स्वभावाने त्रस्त असलेल्या बापाने टोकाचे पाऊल उचलले.या घटनेची उकल होताच सोलापुरातील अनेक नागरिकांनी हळहळ व्यक्त केले.

Sharad Mohol प्रकरणातील आरोपी विठ्ठल शेलारची राहत्या परिसरातून धिंड, व्हिडिओ व्हायरल

दोन दिवस पोलिसकोठडीत रवानगी

क्षुल्लक कारणावरून बापाने विशालचा खून केला.विशाल हा सोलापुरातील एका खाजगी शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता.स्वभावाने विशाल खोडकर होता. शाळेत अभ्यास न करता उलट इतरांना त्रास द्यायचा. त्याबद्दल शाळेतून सतत तक्रारी येत होत्या. घरातही तो उध्दट वागायचा. सतत मोबाईल पाहण्यात गुंग असायचा. कितीही समजावून सांगितले तरी त्याच्या वागण्यात बदल होत नव्हता. संतापलेल्या विजय याने मुलगा विशाल यास १३ जानेवारी रोजी दुचाकीवर बसवून सोलापूर तुळजापूर रस्त्यावर नेले आणि त्यास एका शीतपेयातून सोडिअम नायट्रेट विषारी पावडर मिसळून पाजली. त्यामुळे विशाल थोड्याच वेळात बेशुध्द पडला आणि विशालचा मृत्यू झाला. जोडभावी पेठ पोलिसांनी सोमवारी दुपारी कोर्टात हजर केले असता कोर्टाने विजयला दोन दिवसांची पोलिसकोठडी रवानगी केली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.