Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Moto G24 Power ची किंमत
मोटरोलाचा नवीन G24 Power स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये भारतीय बाजारात आणला आहे. डिवाइसच्या ४जीबी रॅम व १२८जीबी व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे तर ८जीबी रॅम व १२८जीबी मॉडेल ९,९९९ रुपयांचा आहे. हा मोबाइल ग्लेशियर ब्लू आणि इंक ब्लू अश्या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
स्मार्टफोनवर ब्रँड ७५० रुपयांचा एक्स्ट्रा एक्सचेंज बोनस देत आहे. मोबाइलची विक्री फ्लिपकार्ट, कंपनी वेबसाइट आणि अन्य रिटेल स्टोर्सवर होईल.
Moto G24 Power चे स्पेसिफिकेशन्स
Moto G24 Power मोबाइलमध्ये ६.६ इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात पंच-होल कटआउट डिजाइन मिळते. प्रोसेसिंगसाठी हेलियो जी८५ चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, जोडीला ग्राफिक्ससाठी माली जी५२ एमपी२ जीपीयू आहे. फोन ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसह विकत घेता येईल. मोटोरोला G24 पॉवर अँड्रॉइड१४ वर चालतो.
Moto G24 Power स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, एलईडी फ्लॅशसह मिळतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
पावर बॅकअपसाठी मोटो जी२४ पावर मध्ये ६०००एमएएचची मोठी बॅटरी आणि ३३वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी मोबाइलमध्ये ड्युअल सिम ४जी, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ३.५मिमी हेडफोन जॅक, आणि एफएम रेडियो सारखे ऑप्शन मिळतात. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक, पाणी आणि धुळीपासून रक्षण व्हावं म्हणून IP52 रेटिंग, आणि चांगल्या ऑडियोसाठी स्टीरियो स्पिकरसह डॉल्बी अॅटमॉसचा सपोर्ट मिळतो.