Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मित्रपक्षांच्या फक्त जागा ठरवा, उमेदवार नको; मविआच्या जागावाटपाआधी संजय निरुपम बरसले

11

मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपबाबत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सूचक ट्वीट करत मित्रपक्षांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. सहकारी पक्षांच्या जागा ठरवा, उमेदवार नको, असा खोचक टोलाही निरुपम यांनी लगावला आहे.

संजय निरुपम यांचं ट्वीट काय?

लोकसभेच्या जागा वाटपासाठी आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होत आहे. प्रक्रिया तीच आहे. मुंबईतच प्राथमिक चर्चा होणार होती. बिहार आणि बंगालमध्ये जे घडले त्यातून आपण नक्कीच शिकले पाहिजे. एकमेकांचा आदर राखूनच जागांबाबत निर्णय घ्यावा. असा निर्णय, जो सर्वांना मान्य असेल. आणि हो, फक्त जागा ठरवा, इतर पक्षांचे उमेदवार नाही. अन्यथा महाआघाडीत असंतोषाचे तडे वाढू लागतील. इंडिया आघाडीला वाचवण्याची जबाबदारी फक्त काँग्रेसची नाही तर सर्वांची आहे, असं स्पष्ट मत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.

छत्रपती शिवरायांच्या नव्या सिंहासनाचं पूजन, ठाकरेंचा सिंधुदुर्ग दौरा ठरला, उमेदवारही निश्चित
याआधी, लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत गेल्या गुरुवारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जवळपास सात तास चर्चा झाली होती. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याचे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चार जागा देण्याबाबत काहीच निश्चित ठरले नसल्याचे सांगून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राऊत यांना उघडे पाडले होते. त्यामुळे जागावाटपाचे सूत्र अंतिम व्हायला आणखी काही दिवस लागणार असल्याचे स्पष्ट झाले.

दाऊदला पळवलंय, नगरची गुंडगिरीही मोडू; राऊतांचा जगतापांना इशारा, आता समर्थकाचं प्रत्युत्तर
या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, विनायक राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते, तर प्रकाश आंबेडकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

बातम्यांमधून प्रसिद्धी, टीआरपी; अजित पावरांचा राऊतांना टोला

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.