Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आंदोलनाच्या भीतीने अहमदनगरमध्ये प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

9

हायलाइट्स:

  • गणेश मूर्तीचे प्रत्यक्ष मुखदर्शन घेण्यास मनाई
  • विरोधकांकडून आंदोलन केली जाण्याची शक्यता
  • प्रशासनाने जिल्ह्यात दिला जमाव व शस्त्रबंदीचा आदेश

अहमदनगर : करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात अद्यापही आंदोलने सुरू आहेत. त्यातच आता गणेशोत्सवात मंडळाच्या गणेश मूर्तीचे प्रत्यक्ष मुखदर्शन घेण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयानंतर विरोधकांकडून आंदोलन केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने २४ सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचा आदेश दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यासाठी जमावबंदीचा आदेश देताना जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्याची कारणे आदेशात नमूद केली आहेत. पोलीस अधीक्षकांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार कलम ३७ (१) (३) नुसार म्हणजेच जमाव व शस्त्रबंदीचा आदेश देण्यात आला आहे.

Congress: काँग्रेसवरील पवारांच्या टीकेला पटोलेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्या’ लोकांनीच डाका घातला!

या आदेशात म्हटलं आहे की, ‘सध्या जगभरात व राज्यात करोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोविड रुग्ण इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त असल्याचं दिसून येत आहे. सरकारच्या ब्रेक द चेन संबंधीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक ते आदेश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. मधल्या काळात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ चे आदेश यापूर्वी निर्गमित केले होते. ते आता शिथील करण्यात आले आहेत. आता गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून किरकोळ कारणावरुन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून मिरवणुकीत, धार्मिक कार्यक्रमात गर्दी करु नये, तसंच गणेश मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष दर्शन घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. यासंबंधी सरकारने सार्वजनिक गणेश मंडळांना सूचना दिलेल्या आहेत,’ अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

करोनासोबतच काही लोकांच्या मनातील द्वेषाचा रोग दूर कर; छगन भुजबळांचे बाप्पाला साकडे

कधीपर्यंत असणार जमावबंदी?

‘सरकारच्या मिरवणूक मनाई व प्रत्यक्ष मुखदर्शन न घेणे बाबतच्या आदेशाविरुद्ध विविध संघटना, राजकीय पक्ष यांची आंदोलने होऊ शकतात. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी करुन प्रशासनास वेठीस धरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यामध्ये विविध राजकीय पक्ष, कामगार संघटनांतर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रस्ता रोको कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर अहमनगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणन पोलिसांना कर्तव्य बजावताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात येत आहे. हा आदेश १० ते २४ सप्टेंबर या काळात लागू राहणार आहे,’ असं आदेशात म्हटलं आहे.

जमावबंदी काळात कोणती बंधने असणार?

पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, मिरवणूक काढणे, लाठ्या काठ्यांसह अन्य शस्त्र जवळ बाळगणे, मोर्चे, आंदोलन करणे, घोषणा देणे, प्रक्षोभक भाषण करणे, सभ्यता अथवा नितीमत्तेला धोका पोहोचेल असं कोणतंही कृत्य करणे, अशा गोष्टींना जमावबंदी आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.