Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विचखेडा येथे झालेल्या पशुधनाच्या जिवीतहानीमुळे दोषींवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या.
पारोळा : प्रतिनिधी विकास चौधरी – मौजे विचखेडा ता.पारोळा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात बोभाट्या नाल्यावर पुल बांधकामासाठी शेतकऱ्यांसाठी दळणवळणाच्या भर शेतरस्त्यात खोलवर खोदकाम करून खड्डे करण्यात आलेले आहे. सदर ठिकाणी कुठेही सुचना फलक अथवा मार्गदर्शन चिन्ह लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यावरून वापरणाऱ्यांना कुठलाच अंदाज येत नाही. दिनांक १० सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने सदर खड्ड्यांमध्ये तुंब पाणी भरून रस्त्यावर वाहु लागले. १० सप्टेंबर रोजी विचखेडा येथील शेतकरी बाबुलाल रामा माळी हे आपल्या दैनंदिन नियोजनानुसार कुटुंबासह बैलगाडीवर आपल्या शेतात निघाले. सदर खड्ड्यांचा ठिकाणी बैलांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बैलगाडी, दोन्ही बैल, माळी आपल्या कुटुंबासह खड्ड्यात बुडाले. सदर ठिकाणी सभोवताली असलेल्या नागरीकांना हा प्रकार कळताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत माळी व त्यांच्या कुटुंबियांना कसे बसे करू बाहेर काढले. मात्र दोन्हीही बैलांना बाहेर काढण्यात अपयश आल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. यासमयी बाबुलाल माळी त्यांसह कुटुंब व सदर ठिकाणी उपस्थित सरपंच रविंद्र पानपाटील, सदस्य अमोल पाटील, भरत माळी, नाना माळी, बापु गढरी, वैभव पाटील, हितेंद्र देवरे, गोपाल माळी, हितेश पाटील, शाहरूख शेख, रोहित पाटील, रंजित पाटील व इतर नागरीकांनी यांनी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेवून झालेला प्रकार सांगितला. याची त्वरीत दखल घेवून आमदार चिमणराव पाटील यांनी तहसिलदार, नही प्रा.लि.चे व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधुन झालेला प्रकार लक्षात आणुन दिला व सदर प्रकरणी दोषींवर कडक कार्यवाही करून माळी यांना तात्काळ झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यात यावी असे आदेश दिले व माळी त्यांसोबत उपस्थित नागरीकांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा सुचना देखील केल्या. तसेच सदर प्रकरणी मी आपल्या सोबत असुन माळी यांच्यासह रस्त्यामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी मी बारकाईने सदर प्रकरणी लक्ष ठेवुन असल्याचे यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.