Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus नं लाँच केला १४ हजारांपेक्षा कमी किंमतीत 5G Smartphone, मिळते ५०००एमएएचची बॅटरी

9

वनप्लसनं एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे ज्याचे नाव वनप्लस नॉर्ड एन३० एसई ५जी आहे. हा फोन यूएई मध्ये लाँच झाला आहे आणि याची किंमत १३,५६० रुपयांच्या आसपास आहे. या फोनमध्ये चांगला डिस्प्ले आहे आणि हा नवीन अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात ५००० एमएएचची मोठी बॅटरी देखील देण्यात आली आहे जी दीर्घकाळ टिकते. कंपनीनं फोन काळ्या आणि निळ्या रंगात सादर केला आहे.

OnePlus Nord N30 SE 5G ची किंमत

युएईमध्ये वनप्लस नॉर्ड एन३० एसई चा एकमेव मॉडेल लाँच करण्यात आला आहे, ज्यात ४जीबी रॅमसह १२८ जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. ज्याची किंमत ५९९ एईडी आहे. ही किंमत १३,५६० भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन भारतीय बाजारात उपलब्ध होईल की नाही हे मात्र कंपनीनं सांगितलं नाही.

OnePlus Nord N30 SE 5G चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस नॉर्ड एन३० एसई ५जी मध्ये ६.७२ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचा पिक्सेल रिजॉल्यूशन १०८०x२४०० आहे. या फोनमध्ये मागील बाजूस दोन कॅमेरा आहेत. पहिला कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे, जोडीला दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

हा ५जी सक्षम स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी ६०२० चिपसेटसह आला आहे, सोबत ४ जीबी देण्यात आला आहे. वनप्लस नॉर्ड एन३० एसई ५जी मध्ये १२८जीबी स्टोरेज आहे, जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. हा ५जी फोन अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ऑक्सिजन ओएस १३.१ वर चालतो.

फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.तसेच कंपनीनं फेस अनलॉकची सुविधा देखील दिली आहे. तसेच यात स्टीरियो स्पिकर्सचा देखील समावेश करण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० एमएएचची मोठी बॅटरी आहे, जी दीर्घकाळ चालते. तसेच ही चार्ज करण्यासाठी कंपनीनं ३३ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.