Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

5-6 नव्हे तर 10000mAh Battery सह येतोय शाओमीचा टॅबलेट; मिळेल १२.४५ इंचाचा वेगवान डिस्प्ले

7

Xiaomi संबंधित बातमी आली आहे की कंपनी आपल्या नवीन टॅबलेटवर काम करत आहे जो ‘पॅड ७’ सीरीजमध्ये जोडला जाईल. हा डिव्हाइस Xiaomi Pad 7 Pro नावाने लाँच होऊ शकतो. कंपनीनं मात्र या डिव्हाइस बाबत कोणतीही माहिती दिली नाही परंतु ताज्या लीकमध्ये पॅड ७ प्रोचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत, जे तुम्ही पुढे वाचू शकता.

Xiaomi Pad 7 Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स

शाओमी पॅड ७ प्रो संबंधित ही माहिती डिजिटल चॅट स्टेशननं लीक केली आहे. चीनी मायक्रो ब्लागिंग साइट वेइबोवर या आगामी टॅबलेटचे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले आहेत, ज्यात प्रोसेसर, बॅटरी आणि स्क्रीनची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या डिव्हाइसला IMDA आणि 3C सर्टिफिकेशन्स मिळाले आहेत, ज्यामुळे कंपनी लवकरच हा बाजारात आणू शकते.

शाओमी पॅड ७ प्रो बद्दल सांगण्यात आलं आहे की हा टॅबलेट डिवाइस क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल मोबाइल चिपसेट स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ वर लाँच केला जाऊ शकतो. ही ४ नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेली चिप आहे जी ३.४गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालते. हा मॉडेल अँड्रॉइड १४ आधारित हायपरओएसवर सादर होऊ शकतो.

लीकनुसार हा शाओमी टॅबलेट १०,०००एमएएचच्या बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच ही दमदार बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी या डिव्हाइस मध्ये १२०वॉट फास्ट चार्जिंग देखील मिळू शकते. Xiaomi Pad 7 Pro ची फक्त बॅटरी नव्हे तर डिस्प्ले देखील खूप मोठा असेल. लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की हा टॅबलेट १२.४५ इंचाच्या स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो. हा एलसीडी डिस्प्ले असू शकते जो १६:१० अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला असेल तसेच १४४हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल.

फोटोग्राफीसाठी शाओमी पॅड ७ प्रो मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. समोर आलेल्या माहितीनुसार या टॅबलेट डिव्हाइसच्या बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेन्सर असतील. अजूनतरी सेल्फी कॅमेऱ्याची माहिती समोर आली नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.