Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नागपुर पोलिसांनी उघड केला लोकांचे भुखंडावरचे श्रीखंड खाणारे टोळीचा पर्दाफाश,मोठे मासे गळाला लागणार…

6

नागपुर शहरात असणार्या मोकळ्या भुखंडाची माहीती गोळा करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याची विक्री करुन भुखंड वरचे श्रीखंड खाणारी टोंळी सदर पोलिसांचे ताब्यात…

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २८/०२/२०२३ चे १२:०० वा ते दिनांक २९/०७/२०२३ चे ५.:०० वा. चे दरम्यान यातील आरोपी

१) इमाम खान अब्दुल रहीम खान वय ३३ वर्षे रा. बेसा बेलतरोडी, नागपूर,
२) पवनकुमार कालकाप्रसाद जंगेला वय ३४ वर्षे य. मनिष नगर, बेसा बेलतरोडी, नागपूर,
३) नारायण वर्मा
४) बनावट निशा जाजु उर्फ प्रतिभा विलास मेश्राम वय ४६ वर्षे रा. उमरेड, नागपूर ग्रामीण,
५) विजय उईके.
६) कौशल संजय हिवंज वय २२ वर्षे परसोडी वर्धा रोड, नागपूर,
७) अथर्व श्रीकृष्ण भाग्यवंत वय २२ वर्षे रा. गोपाल नगर, नागपूर.
८) भुपेश कवडुजी शिंदे वय ४० वर्षे य, शंकरपुर बेलतरोडी, नागपूर
९) प्रविण मोरेश्वर सहारे वय ४६ वर्षे य. गोधनी मानकापूर नागपूर.
१०) साहील बिलाल षेख वय २३ वर्षे रा. भामटी रोड, सुजाता ले आउट, नागपूर,
११) कार्तीक उर्फ रजत शिवराम लोणारे वय ३० वर्षे रा. मेहंदीबाग रोड, शांतीनगर,
१२) सिध्दार्थ वासुदेव चव्हाण वय ४० वर्षे रा. प्लॉट नं. २९, स्नेहदिप कॉलोनी, जरीपटका, नागपूर,
१३) मोहम्मद रियाज उर्फ बबलु अब्दुल रउफ वय ५४ वर्षे रा. कसाबपुरा, मोमीनपुरा तहसील,
१४) नासीर हसन खान वय ४३ वर्षे रा. स्वागत नगर, गिट्टीखदान,
१५) इमरान अली अख्तर अली वय ४३ वर्षे रा. संजय बाग कॉलोनी, यशोधरानगर, नागपूर.
१६) रुपेश अरुण वारजुरकर वय ३४ वर्षे रा. महात्मा फुले नगर, अजनी नागपूर,

यांनी संगणमत करुन यातील फिर्यादी

सौ. निशा राजकुमार जाजु वय ६३ वर्षे रा. प्लॉट नं. ५८ सी,
निकुंज नवजीवन कॉलोनी, गजानन नगर, कोठारी हॉस्पीटलच्या मागे, पो. ठाणे अजनी नागपूर शहर..

यांचे नावे खोटे कागदपत्र तयार करुन व त्यांचे नावाचा वापर
करुन यातील फिर्यादी नामे सौ. निशा राजकुमार जाजु हिचे नावावर असलेला वार्ड मुधा क्रमांक ४, अंतर्गत मौजा नारा, प.ह.नं. ११, खसरा क्रमांक १३९, भुखंउ क्रमांक ८९.९० एकुण क्षेत्रफळ ३००० चौ. फुट हा दस्त क्रमांक ११८६ दिनांक १८/११/१९९२ रोजी फिर्यादी यांनी खरेदी केला होता. नमुद प्लॉट यातील आरोपींनी संगणमत करुन आरोपी क्र १ ईमान खान अब्दुल रहीम खान वय ३३ वर्षे यास विक्री करण्याचा बहाणा करून यातील फिर्यादीच्या प्लॉटचे ५,००,०००/- रु ला विक्री करून फसवणुक केली असता फिर्यादी ह्या पतीला इनकम टॅक्स रिटर्न  भरणा करण्याकरीता सीए कडे गेले असता माहीती पडल्याने त्यांनी आपल्या पतीसोबत मा दुय्यम निबंधक कार्यालय नागपूर येथे जावुन चौकशी केली असता त्यांनी माहीती मिळाली की, त्याच्या नावावर असलेला भुखंड हा त्यांचे नावाचे खोटे कागदपत्र व बनावट महिला हिला उभे करून भुखंडाची विक्री केल्याचे समजुन आल्याने फिर्यादी यांनी पोलिस ठाणे सदर, नागपूर शहर येथे दिलेल्या अर्जावर चौकशी अंती फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्ट वरुन दिनांक ६/११/२३ रोजी आरोपी नामे इमाम व इतर ७ यांच्या विरुध्द अपराध क्रमांक ७०६ / २०२३ कलम ४१९, ४२० ,४६५,४६८, ४७१.३४ भा.दं.वि. वाढीव कलम ४६७ भादंवी प्रमाणे दाखल करण्यात आला.
नमुद गुन्हयाच्या प्राथमिक तपासा दरम्यान आरोपी यांना गुन्हा दाखल झाल्याची माहीती  मिळाल्यावरून सर्व आरोपी पसार झाले होते. दरम्यान नमुद गुन्हयातील बनावट महिला

सौ निशा राजकुमार जाजु हिने तिचे बनावट नावाचे खाते दि महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑपरेटिव्ह बँक मुंबई, बेहरामजी टाउन, सदर शाखा नागपूर येथे यातील अटक आरोपी क्र ९ प्रविण सहारे हा तिच्या बनावट खात्यातुन पैसे ट्रान्सफर करण्याकरीता आला असता नमुद बँकेच्या अधिकारी यांनी प्रविण सहारे यास पैसे देण्यास नकार
दिल्याने प्रविण सहारे हा नमुद बँकेच्या मुख्य शाखेत जावुन पैसे ट्रान्सफर करण्याच्या तयारीत असतांना त्यास गोपनिय बातमीदार याच्या माहीती वरुन त्यास अटक करण्यात आली त्यास नमुद
गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देवुन गुन्हयात वेळ काढूपणा केला व त्यास मा. न्यायालयाने मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. त्यानंतर नमुद गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील विक्रीपत्रामध्ये साक्षीदार म्हणुन स्वाक्षरी करणार पवनकुमार जंदेला, बनावट निशा राजकुमार जाजु हिच्या बॅकेतुन ऑनलाईन स्वरुपात पैसे प्राप्त करणारे कौशल हिवंज, अथर्व भाग्यवंत यांना अटक करण्यात आले होती. नमुद आरोपी सद्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
तपासा दरम्यान आरोपी प्रविण सहारे याच्या जप्त मोबाईल मधुन असे दिसुन आले की, प्रविण सहारे हा इतर आरोपींच्या मदतीने खोटे बनावटी कागदपत्र तयार करून प्लॉट विक्रीचा रॅकेट मध्ये सहभागी
आहे. यावरून नमुद गुन्हयात सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात काम करणार इसम नामे कार्तीक उर्फ
रजत लोणारे यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता तो दुयम निबंधक कार्यालय येथुन त्याच्या परीचीत सिध्दार्थ चव्हाण यास मागणी केल्याप्रमाणे रेकॉर्ड मधुन कागदपत्र पुरवित असल्याचे सांगितले तसेच

आरोपी प्रविण सहारे याच्या सिध्दार्थ चव्हाण याच्या सोबत नियमित संभाषण होत होते त्याच वेळी सिध्दार्थ चव्हाण हा कार्तीक उर्फ रजत लोणारे याच्या सोबत फोन वर संपर्क करुन कागदपत्राची मांगणी करीत असल्याने नमुद गुन्हयात आरोपी कार्तीक उर्फ रजत लोणारे व सिध्दार्थ चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. तसेच नागपूर शहरात इतर पोलिस ठाणे येथे दाखल असलेल्या या प्रकारच्या गुन्हयाची माहीती प्राप्त करून त्या माहीतीचा अभ्यास केला असता तसेच पोलिस ठाणे सदर नागपूर शहर येथे दाखल अपराध कमांक २३० / २०२३ या गुन्हयातील आरोपी मोहम्मद रिजवान याचा सहभाग असल्याचे दिसुन आल्याने त्यास  नमुद गुन्हयाच्या तपासात ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने माहीती दिली की, नमुद गुन्हयात आरोपी इमाम खान व प्रविण सहारे याच्या सांगण्यावरून त्याने आरोपी नासीर खान याच्या मदतीने बनावट महिला हिचे नावाचे खोटे आधार कार्ड व पॅनकार्ड तयार केले आहे. तसेच आरोपी इमरान अली याने नमुद भुखंडाचे खोटे कागदपत्र तयार केल्याचे माहीती दिल्याने यातील आरोपी इमरान खान यास ताब्यात घेवून त्यास विचारपुस करुन त्याच्या जवळील वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये वर नमुद जप्ती मधील काही कागदपत्र मिळुन आल्याने त्यास पोलिस ठाणे येथे आणुन अधिक विचारपुस करुन त्याच्या जरीपटका येथील घरी घरझडती व त्याच्या घरा समोर उभ्या असलेल्या ऑडी कारची झडती  घेतली असता गुन्हयातील जप्त केलेले इतर कागदपत्र तसेच नकली बनावटी नोटा मिळुन आलेल्या आहेत.
त्या बनावटी नोटा त्याने कोठुन प्राप्त केल्या याबाबत तपास सरु आहे. तसेच यातील आरोपी नामे मोहम्मद रियाज याच्या घराची व त्याच्या कारची तपासणी केली असता त्याच्या कार मधुन वर नमुद जप्त मुद्देमालाचे कागदपत्र मिळुन आले आहेत. तसेच अपराध क्रमांक २३० / २०२३ मध्ये आरोपी इरशाद अहमद निसार अहमद
याच्या जवळुन तपासी अधिकारी पोउपनि नारायण घोडके यांनी घर झडती दरम्यान बरेच कागदपत्र व बनावटी आधारकार्ड प्राप्त केले असुन नमुद गुन्हयातील फिर्यादी सौ. निशा राजु हिचे नावाची नागपूर सुधारप्रन्यास ची फाईल सुध्दा मिळुन आलेली आहे.
तरी नमुद कागदाची पाहणी केली असता असे दिसुन येते की, यातील आरोपी हे टोळीनिशी काम करून त्यांनी नागपूर शहर व आजुबाजुच्या भागातील ब-याच जमीनी बनावट कागदपत्राच्या आधारे  खोटे कागदपत्र तयार करून विक्री केलेले आहे.
तरी नागपूर शहर व आजुबाजुच्या परीसरातील नागरीकांना याद्वारे आव्हान करण्यात येत आहे की, ज्या नागरीकांची वर नमुद प्रकरणा सारखी फसवणुक झालेली आहे किंवा तसा प्रयत्न झाला असेल तर
|त्यानी समोर येवुन त्याबाबत पोलिस विभागाला माहीती दयावी. त्याचप्रमाणे ज्या नागरीकांनी त्यांच्या मालकीच्या भुखंडाचे मागील ४ ते ५ वर्षापासुन किंवा अधिक कालावधी पासुन स्वतःच्या मालकीबाबत पाहणी किंवा पाठपुरावा केला नसल्यास त्यांनी नागपूर सुधार प्रन्यास येथे जावुन आपल्या भुखंडाची पडताळणी करून घ्यावी.

यात खाली नमुद कागदपत्रे जप्त करण्यात आलात…

१) विविध मुळ विकीपत्र २) खोटे बनावटी आधार कार्ड ३) खोटे बनावटी पॅन कार्ड ४) विविध बनावटी विक्रीपत्र ५) विविध विक्रीपत्राचे कोरे नमुने ६) नागपूर सुधार प्रन्यास येथील विविध भुखंडाच्या फाईल ७) नागपूर सुधार प्रन्यास येथील विविध मुळ कागदपत्र ८) सह दुयम निबंधक यांच्या कार्यालातुन प्राप्त करण्यात आलेली विक्रीपत्राच्या झेरॉक्स प्रति ९) विविध एनए ऑर्डर ची प्रत काही मुळ तर काही बनावटी १०) ५०० रुपयाच्या नकली तयार केलेल्या नोटा एकुण १२ व ते तयार करण्याचे कागदपत्र ११) तीन कार ( ऑडी, स्विफ्ट डिजायर,फोर्ड) १२) दोन दुचाकी (एक्टीवा, टिव्हिएस) १३) रबरी स्टॅम्प विकीपत्रावर लावण्यात येणारा स्टॅम्प १४) नागपूर सुधार प्रन्यास येथे सादर केलले विविध नकाशे मुळ १५) भुमि अभिलेख कार्यालयातील विविध नकाशे १६ )बनावटी स्टॅम्प तिकीट १७) नागपूर शहर व आजूबाजूच्या तालुका येथे असलेल्या जमीनीचे व शेतीचे  झेरॉक्स प्रती १८) विविध बँकेमध्ये बनावट खाते तयार केल्याचे धनादेश पुस्तिका १९) विविध बँकेत तयार
करण्यात आलेल्या बनावट खात्याचे पासबुक २०) बॅकेचे आरटीजीएस चे कोरे फॉर्म २१) विविध लोकांचे पासपोर्ट
फोटो २२) तसचे काही लोकांचे व्यवसायाचा गोमास्ता २३) व गुन्हयाच्या अनुषंगाने तयार केलेले व प्राप्त कागदपत्र

सदरची कामगिरी  अमितेश कुमार, पोलिस आयुक्त नागपूर शहर, श्रीमती अश्वती दोर्जे सह पोलिस आयुक्त,  प्रमोद शेवाळे, अपर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, नागपूर शहर,  राहुल मदने, पोलिस उपायुक्त, परि २, नागपूर शहर,  अभिजीत पाटील सहा. पोलिस आयुक्त, सदर विभाग, नागपूर शहर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक  संजय मेंढे, पो. ठाणे सदर, नागपूर शहर,पोलिस निरीक्षक गुन्हे विनोद रहांगडाले, पो.स्टे. सदर, नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली  पोउपनि संतोष शिरडोळे,  नारायण घोडके, संतोष खांडेकर, पोहवा सुनिल राउत, प्रलेश कापसे ,मपोहवा सविता नाहमुर्ते , पोशि किशोर लोहकरे ,विक्रमसिंग ठाकुर मपोशि संघदिपा सदावर्ते  सर्व नेमणुक पोलिस स्टेशन सदर, नागपूर शहर यांनी पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.