Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांची कारकीर्द कायम वादग्रस्त राहिले आहे. पदभार स्वीकारतात भाजप पदाधिकाऱ्यांसोबत झालेली बाचाबाची, पत्रकारांसोबत झालेली वादावादी आणि अनेक वेळा घेतलेले वादग्रस्त निर्णय यामुळे त्यांची कारकीर्द नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना एक वर्षांची मुदतवाढ मिळाली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच भाजपच्या पदाधिकार्यांकडून तसेच काही सामाजिक संघटनांकडून देखील राहुल रेखावर यांच्या बदलीची मागणी करण्यात आली होती. यामुळे कोणत्याही क्षणी त्यांची बदलीची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यांच्या जागी कोणता नवीन अधिकारी घ्यायचा तसेच आपला मनाप्रमाणे वागणारा अधिकारी यावा यासाठी राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेनेचे नेत्यांची इच्छा होती. तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी पदासाठी दोन आयएएस अधिकारी शर्यतीत होते.
आज राहुल रेखावार यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून त्यांची नियुक्ती महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे या पदावर करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते सध्या पुणे येथे संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे येथे संचालक म्हणून कार्यरत असून ते लवकरच कोल्हापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
१७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
१. नितीन पाटील (IAS:MH:2007) विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई यांची सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. अभय महाजन (IAS:MH:2007) सचिव, दिव्यांग कल्याण विभाग यांची विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. संजय एल. यादव (IAS:MH:2009) सह व्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर, नियुक्ती करण्यात आली आहे.
४. राहुल रेखावार, (IAS:MH:2011) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
५. राजेंद्र क्षीरसागर (IAS:MH:2011) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई उपनगरी जिल्हा, नियुक्ती करण्यात आली आहे.
६. अमोल येडगे, (IAS:MH:2014) संचालक, महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT) पुणे यांना जिल्हाधिकारी, कोल्हापूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
७. श्री मनुज जिंदाल (IAS:MH:2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
८. भाग्यश्री विसपुते (IAS:MH:2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपट्टी संभाजी नगर
९. अवश्यंत पांडा (IAS:MH:2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांची आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१०. वैभव वाघमारे (IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी, ITDP, अहेरी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
११. संजीता महापात्रा (IAS:MH:2020) प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१२. मंदार पत्की (IAS:MH:2020) प्रकल्प अधिकारी, ITDP, तळोदा आणि सहायक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
१३. मकरंद देशमुख (IAS:MH:2020) सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१४. नतिशा माथूर (IAS:MH:2020) संवर्ग गुजरातला महाराष्ट्र बदलत प्रकल्प अधिकारी, ITDP, तळोदा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार म्हणून नियुक्त केले आहे.
१५. मानसी (IAS:MH:2021) सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली
१६. पुलकित सिंहIAS:MH:2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, चांदवड उपविभाग, नाशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकल्प अधिकारी, ITDP, कळवण आणि सहायक जिल्हाधिकारी, कळवण उपविभाग, नाशिक
१७. करिश्मा नायर (IAS:MH:2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, बीड उपविभाग,बीड यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, जव्हार आणि सहायक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.