Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- साकीनाका बलात्कार प्रकरणी मुंबई पोलिसांनी एसआयटी स्थापन केली.
- महिन्याभरात तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करणार- हेमंत नगराळे.
- महिलेचा मृत्यू झाल्याने जबाब नोंदवता आला नाही- हेमंत नगराळे.
ही निंदनीय घटना १० तारखेच्या रात्री घडली. या घटनेची माहिती सुरक्षा रक्षकाने पोलिस कंट्रोल रुमला ३ वाजून २० मिनिटांनी दिली. त्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पीडित महिलेला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.
क्लिक करा आणि वाचा- साकीनाका बलात्कार प्रकरण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले ‘हा’ महत्वाचा आदेश
एक महिन्यात आरोपपत्र दाखल करू- नगराळे
पोलिस आयुक्त नगराळे हे पत्रकार परिषदेत माहिती देत होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले असून त्यादिशेने काम सुरू असल्याचे नगराळे म्हणाले. या प्रकरणाचा योग्य दिशेने आणि जलदगतीने तपास व्हावा म्हणून एसआयटीची स्थापना केली असून येत्या महिनाभरात या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल असे नगराळे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज संपली, रुग्णालयात मृत्यू
पीडित महिलेचा जबाब नोंदवता आला नाही
या प्रकरणी कलम ३०७, ३७६, ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यआत आल्याचेही ते म्हणाले. पीडित महिला अत्यवस्थ होती. तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. यामुळे पीडित महिलेचा जबाब नोंदवता आला नाही. त्यामुळे नेमके काय घडले हे अद्याप सांगता येत नाही. मात्र लवकरच तपासात सर्व गोष्टी उघड होतील, असेही आयुक्त नगराळे यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- साकीनाका बलात्कार प्रकरणी महापौरांचा धक्कादायक खुलासा, आरोपी आणि पीडिता ओळखत अन्…
दरम्यान, पीडित महिलाचा घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाला जलदगतीने न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाचा घटला फास्टट्रॅकमध्ये चालवण्याचे निर्देश दिले.