Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

manohar bhosale remanded police custody: मनोहर भोसलेला पाच दिवसांची पोलिस कोठडी; बारामती न्यायालयापुढे केले हजर

15

हायलाइट्स:

  • संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगणाऱ्या मनोहर उर्फ मामा भोसलेला अटक.
  • शुक्रवारी अटकेनंतर शनिवारी मनोहर भोसले याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले.
  • बारामतीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडून मामा भोसलेस पाच दिवसांची पोलिस कोठडी.

म. टा.प्रतिनिधी, बारामती

संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या मनोहर उर्फ मामा भोसले (वय ३९, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला बारामतीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी पाच दिवस (१६ सप्टेंबरपर्यंत) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. (Manohar Bhosle was remanded in police custody for five days by a Baramati court)

शुक्रवारी (दि.१०) सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्महाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसले याला ताब्यात घेतले होते. त्याला सायंकाळी उशीरा बारामती तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. शनिवारी (दि.११) न्यायाधिशांपुढे त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

क्लिक करा आणि वाचा- साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी, महिन्याभरात दाखल होणार आरोपपत्र

संत बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीची फसवणूक करण्यात आली असल्याची तक्रार आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी अटकेनंतर शनिवारी मनोहर भोसले याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अॅड. किरण सोनवणे यांनी तर भोसलेंकडून अॅड. विजय ठोंबरे यांनी काम पाहिले. भोसले यांचे अन्य दोन साथीदारांना अद्याप फरार आहे. मनोहर भोसले याच्याविरोधात तक्रारी देण्यासाठी नागरिक पुढे येवू लागले आहे. नागरिकांनी निर्भयपणे पुढे येत तक्रार दाखल कऱण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- साकीनाका बलात्कार प्रकरण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले ‘हा’ महत्वाचा आदेश
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज संपली, रुग्णालयात मृत्यू

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.