Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बार्ड अॅडव्हान्ससाठी येत सब्सक्रिप्शन
अँड्रॉइड अथॉरिटीनं आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं की गुगल आपल्या अपकमिंग एआय टूल बार्ड अॅडव्हान्ससाठी सब्सक्रिप्शन मॉडेल आणण्याची योजना बनवत आहे. हाय सब्सक्रिप्शन रेवेन्यूमुळे कंपनी हे प्लॅनिंग करत आहे. गुगल आपल्या अपकमिंग कन्वर्सेशनल एआयमध्ये सब्सक्रिप्शन इंटीग्रेट करून आपला रेवेन्यू वाढवू पाहत आहे. विशेष म्हणजे अपकमिंग अॅडव्हान्स एआय टूल जेमिनी अल्ट्रा आर्किटेक्चरसह लाँच केला जाईल, जो गुगलच्या मल्टीमॉडेल एआय सिस्टम जेमिनीचा एक भाग आहे.
इतका येऊ शकतो खर्च
गुगलनं बार्ड अॅडव्हान्सच्या सब्सक्रिप्शनसाठी किती खर्च येईल हे मात्र सांगितलं नाही परंतु इंडस्ट्री सोर्सच्या मते हे सब्सस्क्रिप्शन चॅटजीपीटी प्लसच्या किंमतीच्या आसपास खर्च देऊ शकतं. यावरून अंदाज लावला जात आहे की युजर्सना दरमहा १० डॉलर आणि २० डॉलर्स दरम्यान म्हणजे ८०० ते १६०० रुपये दरम्यान सब्सक्रिप्शन शुल्क द्यावे लागू शकते.
गुगलला आपल्या अॅडव्हान्स एआयचा वापर मॉनिटायजेशनसाठी करायचा आहे त्यामुळे बार्ड अॅडव्हान्ससाठी सब्सक्रिप्शन प्लॅन सुरु करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. या प्रीमियम सब्सक्रिप्शनच्या माध्यमातून अतिरिक्त रेवेन्यू जनरेट करण्याचा कंपनीचा उद्देश आहे, युजरला अधिक अचूक आणि फीचर रिच कन्वर्सेशनल एआय एक्सपीरियंस मिळू शकतो. ज्यामुळे समजणे आणि समराइज करण्यापासून कोडिंग आणि प्लॅनिंग करण्यापर्यंत अनेक कामं कमांड देताच पूर्ण करता येतील.