Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vivo Y200 5G ची किंमत
२५६जीबी स्टोरेज असलेला विवो वाय२०० ५जी फोन २३,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तसेच याचा १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंट २१,९९९ रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. SBI, IDFC First, Bank of Baroda, IndusInd, DBS Bank आणि Federal Bank युजर्सना २,००० रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. Y200 5G फोन Desert Gold आणि Jungle Green कलरमध्ये विकत घेता येईल.
Vivo Y200 5G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y200 फोनमध्ये ६.६७ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे, कंपनीनं याला अल्ट्रा व्हिजन रिफ्रेश रेट असं नाव दिलं आहे. फोनची स्क्रीन स्मूद आणि टच रिस्पोन्सिव्ह आहे. फोन एचडीआर१०+ सर्टिफिकेशन्ससह येतो. फोनची जाडी ७.६९ मिमी असून याचे वजन १९० ग्राम आहे.
हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन १ चिपसेटवर चालतो. जोडीला ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड १३ आधारित फनटच ओएसवर चालतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये ४,८०० एमएएचची बॅटरी मिळते. फोन ४४ वॉट फ्लॅश चार्जरच्या मदतीनं चार्ज करता येईल.
विवो वाय २०० ५जीमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो ज्यात ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. हा सेन्सर ओआयएस अँटी शेक फिचरला सर्पोट करतो त्यामुळे हात हलला तरी फोटो नीट येतो. सोबत २ एमपीचे दोन कॅमेरा सेन्सर मिळतात. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे. यात लेटेस्ट स्मार्ट ऑरा लाइटचा सपोर्ट देण्यात आला आहे.