Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
cm takes meeting with police officials: साकीनाका बलात्कार प्रकरण: मुख्यमंत्र्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांना ‘या’ महत्वाच्या सूचना
हायलाइट्स:
- साकीनाका बालात्कार प्रकरणाबाबत मुख्यमंत्री बोलावली पोलिस अधिकाऱ्यांची बैठक.
- या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना महत्वाची सूचना दिल्या.
- मुंबईची सुरक्षित शहर प्रतिमा असून ती डागाळू नये यासाठी सतर्क राहावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
साकीनाका येथे महिलेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी महिन्याभरात आरोपपत्र दाखल करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने मु्ख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच उद्यापासूनच या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत दिले.
क्लिक करा आणि वाचा- शरद पवारांची काँग्रेसवर टीका; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. यात ज्या ठिकाणी महिलांची वर्दळ आहे अशी ठिकाणे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी, अशी महत्वाची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. याबरोबरच महिलांवर कोणत्या ठिकाणांवर हल्ले होऊ शकतात किंवा त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उदभवू शकतो अशी ठिकाणे निश्चित करून तेथे गस्त वाढवण्यावर भर द्यावा. प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करावे आणि अशा निश्चित केलेल्या ठिकाणांवर या पथकांनी दिवसा आणि रात्री भेटी द्याव्यात, रस्त्यांवरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे. यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी व अशा ठिकाणी देखील पोलिसांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.
क्लिक करा आणि वाचा- साकीनाका प्रकरणावर राजकारण म्हणजे टाळूवरील लोणी खाणे; संजय राऊत यांचा विरोधकांवर हल्लाबोल
तसेच ज्या व्यक्तींवर महिलांवरील लैंगिक अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा तशा प्रकारची पार्श्वभूमी असेल अशा लोकांवर सतत लक्ष ठेवावे. गुन्ह्याची उकल होण्यासाठी सीसीटीव्हीचा मोठा उपयोग होत असतो. हे लक्षात घेऊन महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा- साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी, महिन्याभरात दाखल होणार आरोपपत्र