Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अखेर पती एमआयडीसी पोलीस स्टेशनला हजर झाला. एमआयडीसी पोलिसांना हकीकत सांगितली. पोलिसांनी आरोपील कुंभारी गावाजवळ असलेल्या विडी घरकुल चौकीत पाठवले. घरकुल पोलिसांनी वळसंग पोलिसांच्या स्वाधीन केले. शरणबसप्पा महादेव हिरोळे (वय ४० वर्ष, रा.यत्नाळ, दक्षिण सोलापूर) असं आरोपीचं नाव आहे. रेखा शरणबसप्पा हिरोळे (वय ३४) असं मृत पत्नीचं नाव आहे. रात्री दीडच्या सुमारास वळसंग पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे.
कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी आर्थिक चणचण
रेखा आणि शरण बसप्पा यांचा विवाह २० वर्षांपूर्वी झाला होता. रेखा आणि शरणबसप्पा या दाम्पत्यास दोन लेकरं देखील झाली होती. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी आर्थिक चणचण भासत होती .त्यामुळे पती पत्नीत सतत भांडण होत होती, मारहाण होत होती. सासू सासरे सोलापुरातील दिंडोरे गावात राहत होते. मृत रेखा हीचा भाऊ ओमान या देशात नोकरीला आहे. सासू सासरे नेहमी पाच ते दहा हजार रुपयांची मदत रेखा आणि शरणबसप्पा यांना करत होते. मेहुणा ओमान देशातून बहिणीला आर्थिक मदत करत होता. शरणबसप्पा हा रोजंदारीवर मजुरीचे काम करत होता. त्यामुळे पतीपत्नीत पैशांच्या कारणावरून सतत कुरबुर होत होती.
थंड डोकं ठेवून पत्नीला संपवलं
शरणबसप्पा आणि रेखा यांच्यात काल बुधवारी सकाळी कडाक्याचे भांडण झाले होते. शरणबसप्पा हा बुधवारी सकाळीच सात वर्षांच्या मुलीला बहिणीकडे सोडून आला. दुपारी पुन्हा रेखा आणि शरणबसप्पा यांच्यात जोरदार भांडण झाले. शरणबसप्पा याने रेखा हीचा इलेक्ट्रीक वायरने गळा आवळला. सुटका होऊ नये यासाठी वायरला पिळा मारल्या. २० वर्षांपासून संसार केलेल्या पत्नीने तडफडत प्राण सोडले. बुधवारी दुपारीच रेखाचा मृत्यू झाला होता. पत्नीला संपवल्यानंतर शरणबसप्पा याने मृतदेहावर चादर घातली आणि घरातील पंखा फास्ट लावला. बाहेरून कडी लावून गावभर फिरला.
संध्याकाळी स्वतःहून सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची कबुली दिली. एमआयडीसी पोलिसांनी हद्द पाहून विडी घरकुल चौकी कुंभारी गावाकडे पाठवून दिले. त्यानंतर वळसंग पोलिसांनी आरोपी नवऱ्याला शरणबसप्पा याला ताब्यात घेऊन घटनास्थळी धाव घेतली. रात्री नऊ वाजल्यापासून गुरुवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला व रेखाच्या आई वडिलांना घटनेची माहिती दिली. २० वर्ष संसार केलेल्या पत्नीचा शेवट अशा प्रकारे झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.