Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पोलिसच GST अधिकारी बनून ट्रकचालकांना गंडा घालायचे…

8

पोलिसच तोतया GST अधिकारी बनून महामार्गावर वाहनांना थांबवुन त्यांना कार्यवाहीच्या नावाखाली लुटणारे धुळे पोलिसांचे ताब्यात…

धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.  4 जानेवारी  रोजी फिर्यादी श्री. कश्मीरसिंग सरदार हजारासिंग बाजवा, वय 59, व्यवसाय व्यापार, रा. घर नं. 50/अ, विकास कॉलनी, पटीयाला, ता.जि.पटीयाला, (पंजाब राज्य) यांनी पोलिस स्टेशन आझादनगर धुळे येथे  दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द आझादनगर पो.स्टे. धुळे येथे गुरनं 02/2024 भादंवि क. 419, 420,341,170,171, 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील अनोळखी 03 ते 04 नमुद आरोपींनी संगनमत करून लाल दिव्याची टाटा सुमो गाडीचा वापर करून फिर्यादी यांच्या मालाचा मालट्रक क्रमांक PB-11/CZ-0756 हा अडवुन ट्रक चालकास जीएसटी अधिकारी असल्याचे भासवुन ट्रकमधील मालाच्या पावत्यांची पाहणी करून टॅक्स इन्व्हाईस बिलात फर्मच्या नावात चुक असल्याचे सांगुन फिर्यादी यांचेशी मोबाईल वरील व्हॉटसअॅप व्दारे संपर्क साधुन फिर्यादीकडुन प्रथम 12,96,000/- रुपये दंडाची मागणी करून त्यानंतर तडजोडी अंती 1,30,000/-
रुपये मोबाइल गुगल-पे व्दारे स्विकारुन फिर्यादी यांची फसवणुक केल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक  श्रीकांत धिवरे यांनी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करुन गुन्हा उघडकीस
आणणेबाबत सहा.पोलिस अधीक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,धुळे विभाग  एस. ऋषीकेश रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  बाळासाहेब थोरात यांना सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपी हे स्वतहा धुळे पोलिस दलात कार्यरत असल्याचे कळते व अटक करण्यात आलेली महीला ही नाशिक पोलिस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची बहीन असल्याचेही कळते यांनी वापरलेल्या गुन्हा करण्याच्या पध्दतीवरुन व तांत्रिक विश्लेषणावरुन सदरचा गुन्हा
उघडकीस आणून आरोपी नामे

(1) स्वाती रोशन पाटील रा. नाशिक

(2) बिपीन आनंदा पाटील रा. धुळे
(3) इम्रान ईसाक शेख रा. धुळे

यांना निष्पन्न करुन नमुद गुन्हयाचा तपास करणे कामी दिनांक
३१/०१/२०२४ रोजी अटक करण्यात आलेली आहे. अजुन बडे मासे या प्नकरणात अडकण्याची शक्यता नाकारतां येत नाही सदर  गुन्हयामध्ये अद्यापपावेतो फिर्यादी व इतर साक्षीदार यांची एकुण ७१,३३,९८४/- रुपयांची फसवणूक झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद गुन्हयातील इतर निष्पन्न आरोपी हे फरार असुन त्यांचा शोध चालु आहे. तसेच आझादनगर पोलिस ठाण्याचे वतीने आवाहन करण्यात येते की, सदर गुन्ह्यातील आरोपीतांनी जी.एस.टी. अधिकारी असल्याचे भासवून ज्या व्यापाऱ्यांची फसवणूक झाली असेल अशा व्यापाऱ्यांनी आझादनगर पोलिस स्टेशन, धुळे येथे संपर्क साधावा.
सदरची कार्यवाही ही श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक, धुळे,किशोर  काळे, अपर पोलिस अधीक्षक धुळे,एस. ऋषीकेश रेड्डी, सहा. पोलिस अधीक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी, धुळे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली आझादनगर पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी पो.नि. बाळासाहेब थोरात, सपोनि.. संदीप पाटील, सपोनि उमेश बोरसे, मपोसई खालीदा सय्यद, पोहवा योगेश शिरसाठ, शांतीलाल सोनवणे, संदीप कढरे, योगेश शिंदे, मुक्तार मन्सुरी, पोना/गौतम सपकाळे, पोकॉ/मकसुद पठाण, अनिल शिंपी, पंकज जोंधळे, सचिन जगताप, सिध्दार्थ मोरे, धिरज काटकर, वंदना कासवे तसेच विशेष पथकातील पोउपनि दत्तात्रय उजे, पोहवा किरण कोठावदे, महेंद्र भदाणे, पोशि निलेश पाकड यांचे पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.