Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

cm thackeray on sakinaka rape case: साकीनाका बलात्कार प्रकरण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

7

हायलाइट्स:

  • साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गृहमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा.
  • खटला फास्ट्रट्रॅक कोर्टात चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.

मुंबई: मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाने मुंबई हादरली असून या प्रकरणी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील णि मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याशीही या प्रकरणाबाबत चर्चा केली. (sakinaka rape case cm uddhav thackeray orders to take sakinaka rape case to fast track court)

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला करोठारतील कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडित कुटुंबाला दिले आहेत. महिलेवर बलात्कार होऊन त्यात तिचा मृत्यू होणे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य आहे. या प्रकरणाबाबत मी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी बोललो असून हा खटला फास्ट्रट्रॅक कोर्टात चालवला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर ते मुंबईच्या पोलिस आयुक्तांशी बोलले. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टीने हालचाली करण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज संपली, रुग्णालयात मृत्यू

आरोपीला १० दिवसांची पोलिस कोठडी

दरम्यान, साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपी मोहन चौहान याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

साकीनाका येथे घडलेली ही घटना मन सुन्न करणारी असून अशा घटना घडणे हे मुंबई शहराच्या लौकीकाला साजेशी नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्य न्यायमूर्तींना भेटून हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी न्यायमूर्तींची भेट घ्यावी असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- साकीनाका बलात्कार प्रकरणी महापौरांचा धक्कादायक खुलासा, आरोपी आणि पीडिता ओळखत अन्…

साकीनाका येथील या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसवण्यात आला. या अमानुष अत्याचारानंतर महिलेची प्रकृती गंभीर होती. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना जास्त रक्तस्त्राव झाल्याने अखेर तिचा मृत्यू झाला.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती; भाजपची राज्य सरकारवर जोरदार टीका

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.