Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अमली तस्करीला चाप; अरबी समुद्रात वर्षभरात एकदाच गैरप्रकार समोर

7

मुंबई : तटरक्षक दलाने अरबी समुद्रावरील देखरेख व टेहळणी करडी केल्याने वर्ष २०२३मध्ये अरबी समुद्रात केवळ एकच अमली पदार्थ तस्करी झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये ४७७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तटरक्षक दलाच्या स्थापनेनंतर प्रथमच इतकी कमी तस्करी पश्चिम समुद्री क्षेत्रात झाली आहे.

१ फेब्रुवारी या भारतीय तटरक्षक दिनाच्या निमित्ताने ही बाब महत्त्वाची बाब ठरते. देशाच्या सागरी किनारपट्टीपासून १२ सागरी मैल अंतरापर्यंतच्या समुद्रावर देखरेख ठेवण्यासाठी १ फेब्रुवारी, १९७७ रोजी तटरक्षक दल कार्यान्वित झाले. यानिमित्ताने हा दिवस साजरा होता. दल १९७७मध्ये कार्यान्वित झाल्याने पश्चिम समुद्री क्षेत्रासह या दलाचे विविध विभाग १९७८पासून स्थापन होऊ लागले. त्यानुसार १९७८ ते २०२३ यादरम्यान पश्चिम समुद्री क्षेत्रात एकूण १५ हजार ३४३.०४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर २०२३मधील हा आकडा ४७७.९६ कोटी रुपये होता. याबाबत दलाचे पश्चिम क्षेत्राचे महानिरीक्षक भिषम कुमार यांनी सांगितले, ‘अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यापासून पाकिस्तानमार्गे गुजरात व तेथून अरबी समुद्रातून पश्चिम किनारपट्टीवर अमली पदार्थ तस्करीचे प्रयत्न वाढले आहेत. मात्र २०२३मध्ये तटरक्षक दलाने टेहळणीची पद्धत बदलली तसेच अन्य संस्थांकडून सातत्याने गुप्त माहितीची देवाण-घेवाण सुरू झाल्याने संपूर्ण वर्षात एकच घटना घडली.
भारतीय नौदलाने समुद्रात चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला; १९ पाकिस्तानी नागरिकांना वाचवले
याखेरीज तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राने १९७८ ते २०२३ यादरम्यान ३ लाख ३१ हजार ५४८ वेळा विविध संशयास्पद बोटी, नौकांची प्रत्यक्ष तपासणी केली. २०२३ मधील हा आकडा २८ हजार १६९ होता. २०२३पर्यंत १६०४ परदेशी मच्छिमार नौकांसह १३ हजार ६१३ परदेशी मच्छिमार भारताचा सार्वभौम अधिकार असलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रात (ईईझेड) आले व त्यांना ताब्यात घेण्यात आले. हा आकडा २०२३ मध्ये अनुक्रमे सात व ६३ होता, अशी माहिती तटरक्षक दलाने दिली आहे.

चिन्मय काळे यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.