Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील दोन कैद्यांचा पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला.
- पेनाच्या पत्र्याच्या हँडलने केला मानेवर वार.
- या प्रकरणी हल्लेखोरांवर गुन्हे दाखल.
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या रेकॉर्डवरील दोन आरोपींनी कारागृहातील बराकीची तपासणीकरण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकारी आनंद पानसरे यांच्या मानेवर पेनाच्या झाकणाला असलेल्या पत्र्याच्या हँडलने जोरदार वार केला. वरिष्ठावर हल्ला झाल्याने मध्ये पडत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करणारे कर्मचारी भाऊसाहेब गांजवे यांच्या ओठावर देखील त्याने वार केला. याप्रकरणी जेल प्रशासनाकडून खडकपाडा पोलीस ठाण्यात महम्मद अल्ताफ उर्फ आफताब खालिद आणि दिलखुश उर्फ अंकित महेंद्र प्रसाद या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Two inmates attack police officer at Aadharwadi jail in Kalyan)
शुक्रवारी १० सप्टेबर रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आनंद पानसरे आणि भाऊसाहेब गांजवे कारागृहातील कैद्याच्या बराकीची पाहणी करत होते. महम्मद आणि दिलखुश या दोघांच्या बराकीतून ते निघत असतानाच अचानक यातील एका आरोपीने पानसरे यांच्यावर पाठीमागून वार केला. पत्र्याला धार काढून त्याला टोकदार बनविण्यात आल्याने त्यांच्या मानेला खोलवर जखम झाली. तर, त्यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या भाऊसाहेब यांच्या ओठावर दुसऱ्या कैद्याने वार केला.
क्लिक करा आणि वाचा- मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी घातला दरोडा; वृद्ध महिला डॉक्टरला लुटणाऱ्या पाच जणांना अटक
आरडा ओरडा होताच इतर कर्मचारी धावत येत त्याच्याकडील हत्यार काढून घेतले असता पेनाच्या झाकणाला अडकविण्यासाठी असलेल्या पत्र्याच्या हँडलला टोक काढून त्यांनी शस्त्र तयार केल्याचे आढळून आले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात या दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा- साकीनाका बलात्कार प्रकरण: मुख्यमंत्र्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांना ‘या’ महत्वाच्या सूचना
कारागृहात हे दोन्ही कैदी अतिशय हिंसकपणे वागत असल्याचे कारागृह अधीक्षक अ. सा. सदाफुले यांनी सांगितले. तर याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय दंडविधान कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या दोन्ही गुन्हेगारावर विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे खडकपाडा पोलिसांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- शरद पवारांची काँग्रेसवर टीका; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…