Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन, अमळनेरमध्ये आजपासून सारस्वतांचा मेळा

8

जळगाव : महाराष्ट्रातील साहित्यरसिक आणि साहित्यप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९७ व्या पर्वाला आज, शुक्रवारपासून अमळनेर येथे सुरुवात होत आहे. एरवी शांत असलेल्या अमळनेरला संमेलनाच्या निमित्ताने उत्सवी स्वरूप आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रवींद्र शोभणे या संमेलनाचे अध्यक्ष असून, खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर संमेलनाच्या उद्घाटनाचा सोहळा रंगणार आहे.

साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून, अमळनेर येथील वाडी संस्थानपासून संमेलनस्थळ असा दिंडीचा मार्ग आहे. दिंडीत प्रतिवर्षीप्रमाणे विविध विषयांवरील चित्ररथ, ढोलताशा पथक, शालेय विद्यार्थी, निमंत्रित साहित्यिक आणि साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत. या ग्रंथदिंडींच्या वाटेवर ठिकठिकाणी खास सजावट आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बालमेळाव्याच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची उत्साही उपस्थिती होती, असाच उत्साही प्रतिसाद ग्रंथदिंडीमध्येही असेल, असा विश्वासही शिक्षक वर्गाकडून व्यक्त होत आहे.

मुंबई काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार, आमदार झीशान सिद्दिकी वडिलांसह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाणार?
संमेलनाच्या उद्घाटन सत्रामध्ये पूर्व संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांच्याकडे संमेलनाची सूत्रे सोपवतील. संमेलनाच्या उद्घाटक माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसेच मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा रंगेल. संमेलनाच्या पहिल्या दिवशी राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संतसाहित्य हाच उपाय, कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक, सयाजीराव गायकवाड यांचे साहित्यिक आणि सामजिक योगदान, तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान, स्वातंत्र्यसंग्रामातील जनजातींचे योगदान या विषयांवर परिसंवाद रंगणार आहेत.

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरणही मुख्य सभामंडपात होणार आहे. याच मुख्य सभामंडपामध्ये सायंकाळी कविसंमेलनही होणार असून, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहामध्येही सायंकाळी कवीकट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे. निमंत्रितांच्या काव्यसंमेलनामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील कवींचाही सहभाग आहे. साने गुरुजींनी ज्या शैक्षणिक वास्तूमध्ये विद्यार्थ्यांना धडे दिले त्या शैक्षणिक वास्तूच्या भूमीमध्ये येणाऱ्या साहित्यिक आणि विचारवंतांचे विचार ऐकण्यासाठी स्थानिक आणि बृहन्महाराष्ट्रातून येणारे साहित्य रसिक उत्सुक आहेत. साने गुरुजींची पुतणी सुधा सानेही गुरुवारी बालमेळाव्याच्या निमित्ताने साने गुरुजी साहित्यनगरी येथे दाखल झाल्या असून, त्यांच्याकडून साने गुरुजींचे साहित्य, त्यांच्या आठवणी जाणून घेण्याचीही रसिकांना उत्सुकता आहे.

Budget 2024: टॅक्स स्लॅब ‘जैसे थे’, तरीही मोदी सरकारची एक घोषणा कोट्यवधी लोकांच्या पथ्यावर, वाचा सविस्तर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.