Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत मिळत आहे Samsung Galaxy S22 5G, जाणून घ्या नवीन प्राइस

6

सॅमसंगनं जानेवारी मध्ये गॅलेक्सी एस२४ सीरीज लाँच केली आहे, नवीन सीरिज येताच जुन्या मॉडेलचाय किंमतीत कपात करण्यात आली आहे. ब्रँडच्या Samsung Galaxy S22 5G स्मार्टफोनच्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी कपात झाली आहे. जर तुम्ही देखील एक नवीन फ्लॅगशिप डिवाइस खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट ४०,००० रुपये असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आली आहे. चला, जाणून घेऊया नवीन किंमत आणि याचे स्पेसिफिकेशन्स.

Samsung Galaxy S22 5G मध्ये कपात

Galaxy S22 5G स्मार्टफोन ८५,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, ज्याची किंमत ४६,००० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. सध्या हा मोबाइल आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमत म्हणजे ३९,९९९ रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या ८जीबी रॅम व १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे.

जर तुम्ही तुमचा जुना मोबाइल एक्सचेंज केला तर तुम्हाला फ्लिपकार्टवर ३८,९०० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळू शकतो. तसेच निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट देखील मिळत आहे. तसेच तुम्ही हा स्मार्टफोन EMI वर देखील खरेदी करू शकता.

Samsung Galaxy S22 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S22 5G मध्ये ६.१ इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा हा पॅनल Dynamic AMOLED 2X आहे, ह्यावर १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. Samsung Galaxy S22 5G स्मार्टफोनमध्ये ३७००एमएएचची बॅटरी, २५वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मिळते.

Samsung Galaxy S22 5G स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर करण्यात आला होता.स्मार्टफोनमध्ये युजर्सना ८जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. Samsung Galaxy S22 5G अँड्रॉइड १२ आधारित वन युआय ४.१ वर चालतो.

Samsung Galaxy S22 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन सह ५०एमपीचा प्रायमरी कॅमेरा, १२एमपी अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि १०एमपीचा अन्य सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १०एमपीचा कॅमेरा आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.