Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्याला हिंजवडी पोलिंसांनी केली अटक,त्याच्याकडून ३,६०,००० रुपये किंमतीच्या एकुण १२ दुचाकी केल्या जप्त….
हिंजवडी(पिपरी-चिंचवड)महेश बुलाख – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन,हिंजवडी येथे तक्रारदार तानाजी मधुकर आमले वय ५२ वर्षे धंदा नोकरी रा. आमलेवस्ती सांगवडे गाव, ता. मावळ, जि. पुणे.यांनी तक्रार दिली की त्यांनी त्यांची दुचाकी दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३.०० वा चे दरम्यान कोलतेपाटील येथील गेटवर लावली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली आहे त्यावरुन हिंजवडी पोलिस स्टेशन येथे गु.रजि. नं ८०/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीत घडणारे वाहनचोरी गुन्ह्यांचे पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक,हिंजवडी पोलिस स्टेशन यांचे देखरेखीखाली हिंजवडी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी योग्य सुचना व मार्गदर्शन केले.त्याअनुषंगाने दाखल गुन्हयाचे घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सदर फुटेजमधील संशयित इसम हा चोरी करण्यासाठी आलेल्या व चोरी करुन गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले
असता सदरचा इसम हा पिपळे सौदागर भागात राहत असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यावरुन त्या भागातील गोपनीय बातमीदारामार्फत माहीती घेतली असता पोलिस हवा केंगले यांना माहीती मिळाली की, सदरचा इसम हा वाकड ब्रिज येथे पांढऱ्या रंगाच्या गाडीवर थांबलेला आहे. त्यावरुन सदर ठिकाणी पोलिसांनी
सापळा लावुन बातमीच्या वर्णनाचा इसमास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव पत्ता
सुर्यकांत बळीराम आडे वय-२५ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. चंद्रकांत जगताप यांची खोली जगताप कॉलनी नं. २ बुध्दविहाराजवळ
पिंपळे सौदागर पुणे मुळ गांव कोल्ही ता. वाशिम जि.वाशिम
असे सांगितले त्याच्या ताब्यातील मोपेड गाडीबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरची गाडी कोलतेपाटील मांरुजी येथुन चोरी केल्याचे सांगितल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक
करण्यात आलेली आहे. तसेच त्याने स्वतहाच्या मौजेसाठी हिंजवडी, देहुरोड, वाकड, तळेगाव दाभाडे, चिखली, हडपसर, इंदापुर भागातुन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगुन त्या काढुन दिल्याने त्या पंचनाम्याने जप्त करुन त्याच्याकडुन खालील मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) हिंजवडी पोलिस स्टेशन गु.र.नं. ८०/२०२४ भा.द.वि. कलम ३७९
२) हिंजवडी पोलिस स्टेशन गु.र.नं. १०७/२०२४ भा.द.वि. क.३७९
३) हिंजवडी पोलिस स्टेशन गु.र.नं. १६१/२०२१ भा.द.वि. क ३७९
४) हिंजवडी पोलिस स्टेशन गु.र.नं.१०८/२०२४ भा.द.वि. क ३७९
५) देहुरोड पोलिस स्टेशन गु.र.नं. १५८/२०२३भा.द.वि.कलम ३७९
६) देहुरोड पोलिस स्टेशन गु.र.नं.२४८/२०२३ भा.द.वि. कलम ३७९
७) वाकड पोलिस स्टेशन गु.र.नं. १२५१/२०२३ भा.द.वि.कलम ३७९
८) तळेगाव पोलिस स्टेशन गु.र.नं.८०/२०२२ भा.द.वि.कलम ३७९
९) चिखली पोलिस स्टेशन गु.र.नं. ६०२/२०२३ भा.द.वि. क ३७९
१०) हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर गु.र.नं. १९१/२०२४भा.द.वि. कलम ३७९
११) इंदापुर पोलिस स्टेशन पुणे ग्रा. गु.र.नं. ९०/२०२४ भादवि .कलम ३७९
ह्या दाखल गुन्हयाबाबत व मालकाबाबत माहिती प्राप्त करत आहोत. सदर आरोपीने चैनीसाठी चोरी केलेल्या एकुण १२ मोटार सायकल किमंत ३,६०,०००/- रू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्या असुन एकुण ११ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे,पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे,पोलिस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी, अप्पर पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड, बापु बांगर, पोलिस उपायुक्त परि २ पिंपरी चिंचवड, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलिस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ
पोलिस निरीक्षक, श्रीराम पौळ, सोन्यावापु देशमुख पोलिस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे, पोलिस शिपाई बंडू मारणे, बापुसाहेब धुमाळ, नरेश बलसाने,
बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी,श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, मंगेश सराटे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश
कांबळे, सागर पंडीत, यांनी केली आहे.